कराड @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
कण्हेर धरणातून कराड मध्ये पुनर्वसित झालेल्या शेतकरयांचे गेल्या चाळीस वर्ष्यापासुन विविध प्रश्न प्रलंबित होते. अनेक आंदोलनात सहभाग घेवूनही हे प्रश्न सुटतनव्हते. अखेर वाघेश्वर ग्रामस्थाननी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, स्वाभिमानी चे कामगार नेते अनिल घराळ बापू, तालुकाध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे , युवा तालुकाध्यक्ष रोहित पाटिल यांची भेट घेतली त्यानंतर पुनर्वासनाचे प्रश्न सुटण्यास सुरुवात झाली आहे.
दि. २६ जानेवारी दिवशी स्वाभिमानी ने मुंडन आंदोलन करून शासनाचा दहावा घातला होता. त्यानंतर पाटबंधारे विभागाने गावठान मोजणीचे पैसे भूमि अभिलेख कार्यालयाकडे जमा केले. प्रांतआधिकारी साहेबांनी मोजणीसाठी दिलेली मुदत 28 फेब्रुवारी रोजी संपत होती तरीही भूमी अभिलेख कोणतीही कार्यवाही झाली नव्हती . यासाठी पुन्हा 1 मार्च ला भूमि अभिलेख कार्यालायावर आंदोलन करण्याचा ईशारा स्वाभिमानी च्या वतीने काल देण्यात आला होता. याची दखल घेवून आज भूमिअभिलेख कार्यालयाकड़ूंन् आज वाघेश्वर ग्रामस्थाना मोजणीच्या नोटिस देण्यात आल्या आहेत व उद्या प्रत्यक्ष गावठाणाची मोजणी भूमि अभिलेख कार्यालयाकडून करण्यात येणार आहे.

0 Comments