Hot Posts

6/recent/ticker-posts

आत्महत्येची सीआयडी चौकशी करा, खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ गुदगे समर्थक रस्त्यावर



मायणी@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
येथील केबल व्यावसायिक मोहन बाबुराव जाधव यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सुरेंद्र गुदगे वर दाखल केलेला गुन्हा हा खोटा व राजकीय द्वेषापोटी केलेला असून त्याविरुद्ध गुदगे समर्थकांनी मोर्चा काढून घटनेची सखोल चौकशी व्हावी व खोटी  फिर्याद मागे घेण्याबाबत निवेदन दिले. या आत्महत्येची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सकाळी सव्वा आकराच्या सुमारास बसस्थानकाजवळून मोर्चास सुरुवात झाली मोर्चात खोटे गुन्हे मागे घ्या, खोटे गुन्हे दाखल करणार्‍यांचा निषेध असो. अशा घोषणा दिल्या गेल्या. अनेकांनी काळ्या फिती लावून मोर्चात सहभाग घेतला होता. मोर्चा मायणी दूरक्षेत्रात पोहोचला तेथे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे यांना ग्रामस्थांच्या वतीने गुदगे वरील खोटी फिर्याद मागे घेण्याबाबत निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की काही राजकीय व्यक्तींनी जाणीवपूर्वक राजकीय द्वेषापोटी फिर्यादी राजाराम मोहन जाधव य यांना पुढे करून त्यांचे वडिलांचे मृत्युचे भांडवल करून सुरेंद्र गुदगे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. गुदगेंना राजकीय त्रास देण्यासाठीच सदरची खोटी फिर्याद दिली आहे. गुदगेंनी जाधव यांना कधीही त्रास दिला नाही दमदाटी केली नाही जाधव हे येळगावकरांचे समर्थक होते व गुदगेंचे विरोधक होते .जाधव यांनी मायणी बँकेतून कर्ज घेतले होते .बँकेने कर्ज वसुलीची सनदशीर मार्गाने कारवाई केली होती. त्यानंतरही मोहन जाधव यांनी कधीही गुदगे विरोधात कसलीच तक्रार केली नाही. याचा विचार करून योग्य तपास करावा. मोहन जाधव यांचे निधन घरीच झाले असे खात्रीशीर समजते .जाधव यांच्या मृत्यूचे कारण वेगळेचआहे .तरीही येळगावकर या घटनेस वेगळा रंग देऊन राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत .
दिनांक 24 रोजी सायंकाळी 7.30ते 10.30 पर्यंत गुदगे कोठे होते, काय करत होते, त्यांचे बरोबर कोण कोण होते. याचीही चौकशी करावी म्हणजे सत्य कळेल. पोलिस यंत्रणेने निपक्षपातीपणे दबावाला बळी न पडता तपास करावा .
सुरेंद्र गुदगे अनेक वर्षांपासून राजकीय जीवनात कार्यरत आहेत जि प सदस्य बँकेचे चेअरमन आदि पदावरती असल्याने केवळ त्यांची प्रतिमा मलीन करण्याच्या दृष्टीने व राजकीय द्वेषापोटी काहीनी त्यांचे विरुद्ध हे कट कारस्थान केले आहे .सदरचे निवेदनावर ग्रामस्थांच्या सह्या आहेत .
जाधव यांना अनेक छंद, व्यसने होती त्यातून काय घडले का? याची व फिर्याद देताना दोन राजकीय व्यक्ती तिथे होत्या त्यांचा येथे काय संबंध होता ते का थांबले होते  त्या व्यक्ती राजकीय असल्याने याचाही तपास करण्यात यावा, अशी मागणी डी. एस. कचरे यांनी केली .
यशवंत काळे म्हणाले गुन्ह्यात नमूद गोष्टींची आम्ही शहानिशा करणार आहोतच  तक्रारदारांची तक्रार घ्यावीच लागते आम्ही योग्य तो तपास करणार आहोतच .आपण सर्वांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवावा असे आव्हान त्यांनी केले.

Post a Comment

0 Comments