Hot Posts

6/recent/ticker-posts

तळीये येथील युवक अपघातात ठार, वाठार स्टेशन येथील स्वामी पेट्रोलपंपानजीक घटना


वाठार स्टेशन @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
 तळीये ता.कोरेगाव येथील नितीन आनंदराव गायकवाड वय 27 या युवकाला(रविवारी) रात्री ८.३०च्या सुमारास वाठार स्टेशन येथे स्वामी पेट्रोलपंपानजीक एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.


घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार नितीन आनंदराव गायकवाड हा आपले नित्याचे काम करून तळीये येथे चालत निघाला होता.तो स्वामी पेट्रोलपंपानजीक गेला असता त्याला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की या युवकाचा जागीच मृत्यू झाला तसेच हे वाहन घेऊन चालक घटनास्थळावरून फरार झाला.


ही घटना समजताच या ठिकाणी वाठार स्टेशन येथील युवक व वाठार पोलीस लगेच घटनास्थळी हजर होऊन घटनेचा पंचनामा करून या युवकाला शवविच्छेदनासाठी पिंपोडे बु।। येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.


नितीन गायकवाडला ज्या ठिकाणी धडक दिली गेली त्याठिकाणी पोलिसांना गाडीचे काही पार्ट आढळून आलेले आहेत व हे पार्ट पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. नितीन आनंदराव गायकवाड याला आई वडील नसल्याने त्याचा सांभाळ हे त्याचे चुलते करत होते. नितीन हा संपूर्ण वाठार स्टेशन मधील दुकानदारांचा परिचयाचा युवक होता तो येथील काही दुकानांमधील नित्याने साफ-सफाई करत असे त्याचबरोबर तो दुकांनमधील बारीकसारीक कामेही करत असत.लग्नाच्या वरातीत तर तो आवर्जून हजरी लावत आणि वरात संपेपर्यंत नाचत असे.  ही घटना समजताच वाठार स्टेशन व तळीये पंचक्रोशीतील  ग्रामस्थ व व्यापारी वर्गामध्ये  हळहळ व्यक्त केली जात आहे

Post a Comment

0 Comments