Hot Posts

6/recent/ticker-posts

फलटण येथील तलाठी लक्ष्मण अहिवळे विरोधात लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल


फलटण @ सत्य सहयाद्री न्यूज नेटवर्क
फलटण तहसीलदार कार्यालय अंतर्गत काम करणारे तलाठी लक्ष्मण सुभाष अहिवळे यांचे विरोधात वाळू, मुरूम, माती वाहतूक व्यवसायास मदत  करण्यासाठी तसेच वाळूची गाडी न पकडण्यासाठी  20 हजार लाचेची मागणी केल्याबाबत व लाच रक्कम स्वीकारलेची मान्य केल्या प्रकरणी तलाठी लक्ष्मण अहिवळे विरोधात लाचलुचपत विभाग पुणे यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्याच्याबाबत फलटण शहर पोलिस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 5 फेब्रुवारी रोजी तक्रारदार प्रभाकर सोपान करचे यांनी दाखल केलेल्या तक्रारी नुसार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 11:58 ते 12:37 वाजण्याच्या सुमारास फलटण तहसील कार्यालयांच्या आवारात प्रभाकर सोपान करचे वय 42 वर्षे राहणार सोमंथळी तालुका फलटण यांना वाळू, मुरूम, माती  व्यवसायत मदत करण्यासाठी तसेच त्यांची वाळूची गाडी पकडण्यासाठी तलाठी लक्ष्मण सुभाष अहिवळे यांनी स्वतःचा आर्थिक फायदा होण्यासाठी तक्रारदार प्रभाकर करचे यांचेकडे पंचाचे समक्ष 20 हजार रुपये रकमेच्या लाचेची मागणी केली व लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले.
 तक्रारदार प्रभाकर करचे याच्या लाच लुचपत विभाग पुणे यांचेकडील दाखल तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 6 रोजच्या पडताळणीत व सापळा स्थगिती कारवाई दरम्यान तक्रारदार, पंच व तलाठी यांचे प्रत्यक्ष भेटीत व मोबाईल वरती झालेले संभाषण तसेच व्हॉइस रेकॉडर द्वारे ध्वनिमुद्रित झालेले संभाषण वरून तलाठी लक्ष्मण सुभाष अहिवळे याचे विरुद्ध फलटण शहर पोलिस ठाण्यात लाचलुचपत विभाग पुणे येथील पोलिस निरीक्षक श्रीमती उत्तरा.ए.जाधव यांनी फिर्याद दिली असून याचा अधिक तपास लाचलुचपत विभाग सातारा पोलिस निरीक्षक श्रीमती ए. जे.मुल्ला करीत आहेत.
 यापूर्वी दिनांक 6 फेब्रुवारी 2018 रोजी तलाठी लक्ष्मण सुभाष अहिवळे याने फलटण शहर पोलिस ठाण्यात मिथिलेश दोशी व प्रभाकर करचे या दोघांच्या विरोधात धक्काबुक्की करून वाळू व्यवसाय सुरू राहण्यासाठी पैशाचे आमिष दाखवुन रास्ता अडवून शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल व ऍट्रोसिटी प्रकरणी तक्रार दाखल केली होती.

Post a Comment

0 Comments