Hot Posts

6/recent/ticker-posts

पानवण ग्रामपंचायतीत वरिष्ठांच्या संगनमताने भ्रष्टाचार


कुकुडवाड/सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
माण तालुक्यातील पानवण ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप बळीराजा शेतकरी संघटनेने केला आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई झाली नाही तर दि. 27 फेब्रुवारी पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा विकास नरळे व बापू गोरवे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पानवण ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. ही बाब वेळोवेळी उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, वरिष्ठ अधिकार्‍यांकडून मनमानी कारभार सुरु आहे. त्यामुळे हा भ्रष्टाचार आजपर्यंत उघड झालेला नाही.  क्लार्क व ग्रामसेवक आणि संबधित अधिकार्‍यांचे साटेलोटे असल्याने हा कारभार दडपण्यात येत आहे.
याची उच्चस्तरावरून चौकशी होणे गरजेचे आहे. यासंदर्भात गावात जनतेचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. स्वच्छ भारत योजनेंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात दिलेली नावे वगळून पती- पत्नी व एकाच घरात लाभ देण्यात आला आहे. त्यामधील लाभार्थीं हा क्लार्क अरूण पोपट तोरणे आहे. त्याची पत्नी: प्रिती अरुण तोरणे, आई द्रोपदा पोपट तोरणे, बापू अण्णा शिंदे त्यांची पत्नी सुमन बापू शिंदे* रामहरी श्रीमंत नरळे, त्यांच्या पत्नी शेशाबाई रामहरी नरळे, मुलगा दत्तु रामहारि नरळे, सून प्रियांका दत्तु नरळे त्याचबरोबर लग्न होऊन परगावी गेलेल्या शैला वसंतराव तुपे, त्यांचे वडील: वसंत कृष्णा तुपे, महादेव सयाजी तुपे त्यांचे वडील सयाजी महादेव तुपे, कुंडलीक भाऊ गोरवे, सुमन भगवान गोरवे, दादासो बाबा गोरवे, मुरलीधर चंदर शिंदे (या एकाच व्यक्तीच्या नावे दोन बिले) पांडुरंग विठोबा तोरणे, खंडू भीमराव तुपे यांच्या नावाने बोगस बिले काढण्यात आलेली आहेत. 
तर दुसरीकडे रमाई घरकुल आवास योजनेंतर्गत मिळणारा लाभ हा वरिष्ठांच्या संगनमताने गरिब व गरजूंना मिळणारा लाभ हा बोगस ठराव व कागदपत्रे सादर करुन अपात्र  लाभार्थींना दिला गेलेला आहे.  द्रोपदा पोपट तोरणे, बापु नारायण गोरवे , ज्ञानेश्वर नारायण गोरवे, वसंत कृष्णा तुपे, वत्सला गुलाब तोरणे, जालिंदर गोविंद तुपे, मारूती जगुन तोरणे यांच्या नावची  बोगस कागदपत्रे जोडून क्लार्क, ग्रामसेवक व अधिकार्‍यांनी संगनमत केल्याचे दिसून येत आहे. यामुळे गरीब महिला आत्महत्या करण्याच्या विचारात आहेत.
हा भ्रष्टाचार उघडकीस आणून संबंधितांवर  कायदेशीर व फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अन्यथा  बळीराजा शेतकरी संघटना 27 रोजी माण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे. असे निवेदन बळीराजा शेतकरी संघटनेचे माण तालुका अध्यक्ष विकास नरळे, पानवन शाखा अध्यक्ष बापू गोरवे यांनी गटविकास अधिकारी, तहसीलदार व माण उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे.

Post a Comment

0 Comments