वरकुटे-म्हसवड @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
म्हसवड पालिकेत सत्ता परिवर्तना नंतर प्रथमच दिड वर्षात दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत मल्हार नगर येथील बेघर वसाहती मधील अंतर्गत असलेले रस्ते सिमेंटकाॅक्रीटीकरण ईश्वर कोले वस्ती ते म्हसवड हिंगणी आप्रोच रस्ता डांबरी करणे व बेघर वसाहत ते डाॅ आंबेडकर नगर रस्ता विदुतीकरण करणे या कामाची भुमिपुजन नगराध्यक्ष तुषार विरकर, उपाध्यक्ष स्नेहल सुर्यवंशी, माजी नगराध्यक्ष श्रीमंत अजितराव राजेमाने, विलासराव माने यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन भुमिपुजन करण्यात आले.
यावेळी पालिकेचे नगराध्यक्ष तुषार विरकर,उपनगराध्यक्षा सौ स्नेहल सुर्यवंशी,नगरसेवक गणेश रसाळ, शहाजी लोखंडे, केशव कारंडे, सौ सविता माने, माजी नगराध्यक्षा वैशाली लोखंडे,मुख्याधिकारी पंडीत पाटील, माजी नगरसेवक युवराज सुर्यवंशी, श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने, सुरेश पुकळे, किशोर सोनवणे,आप्पासाहेब पुकळे, श्रीमंत दिपसिंह राजेमाने, अभियंता चैतन्य देशमाने, रासपाचे अध्यक्ष दादासाहेब दोरगे,प्रकाश डावखरे उपस्थित होते.
पालिका हद्दीतील पालिकेच्या माध्यमातून विविध विकास कामांचे भुमिपुजन करण्यात आले यामध्ये बेघर वसाहत ते ईश्वर कोले वस्ती ते म्हसवड- हिंगणी अप्रोच रस्ता डांबरीकरण करणे, बेघर वसाहत अंतर्गत रस्ते कॉंक्रीटीकरण करणे, मल्हार नगर ते आंबेडकर नगर रस्ते विद्युतीकरण करणे आदी विकास कामांचे भुमिपुजन आजी माजी पदाधिका-यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दलित वसाहत परिसरातील नागरीक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

0 Comments