सातारा@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सायकलस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सूरु आहेत. पिलाजी ऐडके असे जखमीचे नाव असून त्यांची प्रकृती गंभीर आहे पिलाजी ऐडके (वय ५४, रा. मेणवली, ता. वाई, जि. सातारा. मुळ रा. पेनूर, ता. लोहा, जि. नांदेड) हे आपल्या सायकलवरुन व्याजवाडीकडे निघाले होते. याचवेळी त्यांना एका दुचाकीस्वाराने धडक दिली. या घटनेनंतर त्यांच्यावर तत्काळ वाई येथे उपचार केले. मात्र, येथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

0 Comments