Ticker

6/recent/ticker-posts

चार फूट जागा वाचवण्यात खरा वाटा कुमार शिंदे यांचा, बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे मत...


प्रचार रॅली दरम्यान व्यापारी बांधवांकडून उत्स्फूर्त स्वागत व शुभेच्छा....

महाबळेश्वर:- महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेतील दुकानांपुढील चार फूट जागा वाचवण्यात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुमार शिंदे यांनी घेतलेल्या पुढाकाराचे व्यापारी बांधवांनी आज मनापासून कौतुक केले. “बाजारपेठ वाचली ती कुमारभाऊंच्या धडाडीमुळेच,” अशा शब्दांत व्यापाऱ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

याच पार्श्वभूमीवर आज शिंदे यांनी मुख्य बाजारपेठेत व्यापारी व नागरिकांसोबत संवाद साधत, “महाबळेश्वरकरांच्या हितासाठी आजवर एकही तडजोड केली नाही आणि पुढेही करणार नाही,” असा दृढ शब्द दिला.
 शहरातील टॅक्सी संघटनेच्या कार्यालयापासून सुरू झालेल्या प्रचार दौऱ्यात कुमार शिंदे, माजी नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील दुकानदार, नागरिक, ज्येष्ठ मंडळींची भेट घेतली. ठिकठिकाणी व्यापाऱ्यांनी त्यांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या.

व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितले की, बाजारपेठेच्या रुंदीकरणाच्या कामात सर्व दुकाने चार फूट आत घेण्याची अट होती. अनेक छोटे व्यापारी यामुळे अडचणीत येणार होते. याबाबत झालेल्या चर्चेत कुमार शिंदे यांनी रातोरात मुंबई गाठून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना परिस्थिती समजावून सांगितली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय स्थगित झाला आणि महाबळेश्वरची बाजारपेठ अनावश्यक तोट्यापासून वाचली.

व्यापाऱ्यांच्या प्रेमामुळे भारावून बोलताना कुमार शिंदे म्हणाले,
“महाबळेश्वरकरांचे आशीर्वाद आणि नेत्यांचे पाठबळ यामुळेच हा निर्णय शक्य झाला. छोटे व्यापार वाचले, हीच माझ्यासाठी मोठी कमाई आहे.”

प्रचाराच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महाबळेश्वर : मुख्य बाजारपेठेतून फेरफटका मारत मतदारांशी संवाद साधताना 
कुमारभाऊ शिंदे, सौ. स्वप्नाली शिंदे, हेमंत साळवी, पूजा उतेकर, संगीता गोंदकर, प्रशांत आखाडे, मोज्जम नालबंद व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments