Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांचे शांततेचे आवाहन


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

सातारा : साताऱ्यात धुमसलेले मराठा आरक्षण आंदोलन दुपारनंतर निवळले असून, जाळपोळ, तोडफोड, दगडफेक हवेत गोळीबार यामुळे साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात धुमश्चक्री उडाली होती. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, हिंसक झालेल्या जमावावर लाठी चार्ज केला तसेच हवेत गोळीबार करण्यापर्यंत परिस्थिती चिघळली होती. पोलिसांनी यावेळी हिंसक झालेल्या आंदोलकांची धरपकड केली. त्यामुळे दुपारनंतर वातावरण पूर्वपदावर येत परिस्थती निवळली आहे. दरम्यान जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी जिल्हावासियांना शांतता राखण्याचे व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवु नये असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments