Hot Posts

6/recent/ticker-posts

फलटणला गुरुवारपासून मराठा ठिय्या आंदोलन




सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क


फलटण : महाराष्ट्रात मराठा समाजाने आरक्षणासाठी 58 मुक मोर्चे शांततेत काढले मात्र हे राज्य सरकार गंभीर नसल्याने मूक मोर्चा आता ठोक मोर्चा होणार असून याच पार्श्वभूमीवर फलटण येथील अधिकार गृहासमोर गुरुवार दि.26 जुलै पासून फलटण तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन केले जाणार असून जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. राज्यात मराठा समाजाचे मोठे प्राबल्य असतानाही मराठा आरक्षणाची शांततेत मागणी करत आहे विधीमंडळात सातारचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे यांनी मराठा आरक्षणाबाबत सभागृहात आवाज उठविला  पण दुर्दैवाने सत्तेत असणाऱ्या शिवसेना भाजपा सरकारला मराठा आमदारांनी साथ दिली नाही त्यामुळे 142  मराठा आमदारांनी राजीनामे द्यावेत असा सूर ओढला जात असून पंढरपूर ला महापूजेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येऊ न देण्याच्या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत केले जात आहे.


 यामुळे सत्ताधारी व विरोधी आमदार व इतर नेत्यांविरोधात तीव्र नाराजीचे पडसाद उमटले असून आता मूक नव्हे ठोक मोर्चा होणार असून या मुळे आरक्षण द्या नाहीतर चालते व्हा असे समाजाच्या वतीने सांगितले जात आहे. मराठा नेत्यांना आता समाजाचा रोष पत्कारावा लागत असल्याने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला धोका निर्माण झाला असून समाज आता राजकीय लोकांना ठोकून काढले शिवाय राहणार नाही याची सुरुवात छ. शिवाजी महाराजांची सासुरवाडी व छ. संभाजी महाराजांच्या आजोळी फलटण येथे ठोक मोर्चाला सुरुवात होणार असून याची सुरुवात ठिय्या आंदोलन करून होत असून आता आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असलेचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणून सातारा जिल्ह्याकडे पाहिले जाते. मराठा तितुका मिळवावा..अवघा धर्म वाढवावा अशा गर्जेनेप्रमाणे मराठा समाजाने अटकेपार झेंडे फडकाविले. अनेक जाती-जमातीतील बांधवांना आधार दिला. वेळेप्रसंगी स्वत:हाची जमिन सार्वजनिक कामांसाठी दान केली. आज हाच समाज अर्थिक गर्तेत सापडला आहे. त्यामुळे पुढील पिढीला किमान स्वाभीमानाने जगता यावे यासाठी मराठा आरक्षणाची मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments