Hot Posts

6/recent/ticker-posts

सडा वाघापूरचा उलटा धबधबा पर्यटकांचे आकर्षण



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क


पाटण : सध्या पावसाळा सुरू असल्याने पाटण तालुक्यातील प्रसिद्ध नवजा येथील ओझडेॅ धबधब्यासह सह्याद्रीच्या डोंगरपठारातील लहानमोठे धबधबे ओसंडून वाहत आहेत. पण पर्यटकांना  खास आकर्षण आहे ते सडावाघापूर पठारावरील उलट्या धबधब्याची.


तुम्ही सरळ वाहणारे धबधबे खुप पाहिजे असतील, व त्याखाली मनमुराद भिजून ओलेचिंब होऊन आनंद घेतला असेल, पण तुम्ही उलटा वाहणारा धबधबा पाहिलाय का?  पाटण शहरापासून अवघ्या बारा किलोमीटरवर सडावाघापूर गावच्या  डोंगरपठारावर सह्याद्रीच्या कड्यावरून  पावसाचे वाहणारे पाणी वार्‍याच्या प्रचंड दाबाने उलटे पडून धबधबा तयार झाला आहे. रिव्हर्स पॉइंट म्हणून हा वैशिष्टयपूर्ण  धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे. निसर्गाचा हा अदभूत चमत्कार पहायला राज्यभरातील पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत. पवनचक्कीमुळे ओळखला जाणारा हा सडावाघापूरचा विस्तीर्ण डोंगर पठार आता रिव्हर्स पॉइंट म्हणून नावारूपाला येत आहे.


ऐन पावसाळ्यात सडावाघापूर पठार हिरवाईने नटले आहे. एकीकडे  डौलाने फिरणार्‍या सुंदर  पवनचक्क्या तर दुसरीकडे उलटा धबधबा व अंगाला झोंबणारा थंडगार वारा, आणी पाऊस असा निसर्गाचा अप्रतिम  नजराणा पाहण्यासाठी व येथील हिरवाई बहरलेल्या  निसर्गाचा मनमुराद आनंद  लुटण्यासाठी  नक्कीच सडावाघापूरला भेट दिलीच पाहिजे हे नक्की.

Post a Comment

0 Comments