फलटण : फलटण येथील पालखी तळावर तीन भाविकांना विजेचा धक्का लागून झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या फलटण विभागाकडून पालखी सोहळ्यात कोणीही विद्युत तारेवर आकडे टाकून अनधिकृतपणे वीज पुरवठा घेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत महावितरणच्या फलटण विभागाकडून जाहीर आवाहन करण्यात आले आहे. आवाहनात असे म्हटले आहे की, संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०१८ निमित्त बरड गावामध्ये आलेल्या दिंडी प्रमुख व वारकऱ्यांनी विद्युत तारेवर आकडे टाकून अनधिकृतपणे वीज पुरवठा घेऊ नये असे करताना विद्युत अपघात घडण्याची शक्यता असते.
दिनांक १५/७/२०१८ रोजी संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा मुक्काम विमानतळ फलटण येथे होता. विमानतळाच्या पश्चिमेला दिंडी क्रमांक ४९ चा मुक्काम होता. त्या ठिकाणी असलेल्या लघुदाब वाहिनीवरून अनधिकृतपणे आकडा टाकून वीज पुरवठा घेण्यात आला होता. आज दिनांक १६/७/२०१८ रोजी पहाटे ५ च्या सुमारास सदर आकडा काढत असताना दुर्देवाने तो आकडा शेजारील लघुदाब वहिनीला अडकला आणि अपघात होऊन दुर्देवाने दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी झालेला आहे. तरी सर्व दिंडी प्रमुख व वारकऱ्यांना कळकळीची आहे की, कृपया कोणीही विद्युत वाहिनीवर अनधिकृतपणे आकडे टाकून वीज वापरू नये यामुळे जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे असे आवाहन महावितरणच्या फलटण विभागाकडून करण्यात आले आहे.
0 Comments