फलटण : फलटण येथील पालखी तळावर पहाटेच्या वेळी बरड मुक्कामी जाण्यासाठी निघताना तीन भाविकांना विजेच्या केबलचा धक्का लागल्याची घटना घडली. यामध्ये दोन भाविक जागेवरच ठार झाले असून, एक भाविक गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की, आज सोमवार पहाटे 4.30 च्या सुमारास फलटण पालखी तळावरील मुक्कामी थांबलेल्या वारकऱ्यांनी बरड मुक्कामी जाण्यासाठी आवरण्यास सुरवात केली होती. यावेळी पालापासून काही अंतरावर विद्युत वाहक तार गेली होती. याठिकाणी दोन वारकरी आवरत असताना अचानक त्यांना विद्युत केबलचा शॉक लागला यात यात ज्ञानोबा माधवराव चोपडे, वय 65 रा.समतापूर ता. जि. परभणी यामध्ये आणि जाईबाई महादू जामके, वय 60 रा.शिवणी पो.सुनेगाव ता.लोहा जि. नांदेड हे दोन वारकरी ठार झाले तर कमलाबाई गोविंद लोखंडे, वय 65 रा.सासफळ ता.पूर्णा जि. परभणी या महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त करण्यात आली मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी वरकाऱ्यांमधून होत आहे.
0 Comments