शिरवळ येथे कार आणि टेम्पोचा भीषण अपघात ; फलटण येथील नगरसेवक कुंभार यांच्यासह पांडूरंग शिंदे यांचा जागीच मृत्यू - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, September 16, 2018

शिरवळ येथे कार आणि टेम्पोचा भीषण अपघात ; फलटण येथील नगरसेवक कुंभार यांच्यासह पांडूरंग शिंदे यांचा जागीच मृत्यू


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 

(फलटण/शिरवळ) -- पुणे - बैंगलोर महामार्गावर मार्गावर शिरवळ, ता. खंडाळा येथे आज दुपारी स्विफ्ट डिजायर कारने आयशर टेम्पोला पाठीमागील बाजूस धडक दिल्याने झालेल्या अपघातात फलटण येथील दोन जण जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.



याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, फलटण येथील पांडूरंग गोपाळा शिंदे, वय 78 उच्यस्तरीय सल्लागार, महाराष्ट्र खो खो असोसिएशन, रा. लक्ष्मीनगर ,फलटण व जगन्नाथ गणपत कुंभार, विद्यमान नगरसेवक, वय,65, रा. भडकमकर नगर फलटण तसेच अण्णा देशमुख माजी नगराध्यक्ष रा.शिवाजीरोड फलटण आणि चालक आशिष नंदकुमार लोंढे,वय 29 रा. मलटण असे चौघे पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH11- CG- 9394 मधून चालले होते. त्यांची गाडी शिरवळ परिसरात आली असता,शिरवळ येथील आयसीआयसी बॅंकेजवळ चालक आशिष लोंढे यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने आयशर टेम्पो क्रमांक MH04-FJ- 8038  टेम्पोला पाठीमागील बाजूस धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात पांडूरंग गोपाळा शिंदे  व जगन्नाथ गणपत कुंभार यांचा जागीच मृत्यू झाला. तर आण्णा देशमुख व आशिष नंदकुमार लोंढे हे गंभीर जखमी झाले आहेत त्याच्यांवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


अपघाताची माहिती मिळताच फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ.अभिजीत पाटील, शिरवळ पोलिस ठाण्याचे स.पो.नि. भाऊसाहेब पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे काही काळ महगामार्गावर झालेली वाहतूक कोंडी पोलिसांनी सुरळीत केली.


 


No comments:

Post a Comment