‘फसवाफसवी करू नका फक्त, नाहीतर आपल्याला पण कळतं’ उदयनराजेंचा शरद पवारांना इशारा (पहा व्हिडिओ) - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, September 22, 2018

‘फसवाफसवी करू नका फक्त, नाहीतर आपल्याला पण कळतं’ उदयनराजेंचा शरद पवारांना इशारा (पहा व्हिडिओ)


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 

सातारा -- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्याच पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांची शनिवारी साताऱ्यामध्ये भेट झाली. दोघांमध्ये यावेळी जवळपास 15 मिनिटे चर्चा झाली. चर्चा संपल्यानंतर बाहेर पडलेल्या उदयनराजेंना जेव्हा पत्रकारांनी चर्चेबाबत विचारलं तेव्हा ते म्हणाले की मी म्हटलं की ‘राज्यात शरद पवार यांचे आजचे वय पाहता एवढा मोठा कोण नेता आहे का, आपणा सर्वांना लाजवेल अशी धावपळ ते करतात. त्यांना काय सांगणार. फसवाफसवी करू नका फक्त, नाहीतर आम्हालाही कळतं.'  हे वाक्य इथेच थांबवत ते तिथून निघून गेले.

आज सकाळी चर्चा संपल्यानंतर जेव्हा उदयनराजे बाहेर पडले तेव्हा गाड्या सारख्या असल्याने ते चुकून शरद पवार यांच्या गाडीत बसणार होते, मात्र चालक वेगळा असल्याचं दिसताच त्यांना कळालं की ही गाडी आपली नाही, त्यामुळे ते तिथून पुढे निघत त्यांच्या स्वत:च्या गाडीत जाऊन बसले. उदयन राजेंनी 'साहेबांची गाडी आहे. एवढं काय...कलर एकच आहे. वाटले आपली गाडी.' असे म्हणत वेळ मारून नेली. 

No comments:

Post a Comment