राजाळे सरपंच व उपसरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, September 25, 2018

राजाळे सरपंच व उपसरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क


फलटण - राजाळे ता.फलटण येथील सरपंच व उपसरपंच यांच्या मनमाणीला कंटाळून इतर सर्व सदस्यांनी त्या दोघांविरोधात अविश्वास ठराव आणून तो बहुमताने मंजूर केला असल्याची माहिती तहसीलदार विजय पाटील यांनी सांगितले आहे.


फलटण तालुक्यातील सर्वात मोठा आणि जागरूक असलेल्या विडणी जिल्हा परिषद गटाच्या विद्यमान सदस्या सौ.कांचनमाला निंबाळकर यांचे पती सरपंच संभाजी बाळासो निंबाळकर व उपसरपंच सौ.अर्चना गजानन धुमाळ हे दोघे आपल्या पदाचा गैरवापर करुन मनमानी कारभार करीत असल्याचे अनेक वेळा इतर सदस्यांना डावलून काम करीत होते या मुळे त्यांच्या मनमानी ला चाप बसावा म्हणून 13 पैकी 10 सदस्यांनी 19 सप्टेंबर रोजी तहसीलदार विजय पाटील यांचे कडे अविश्वास ठराव दिला होता या मुळे आज सोमवारी दुपारी 4 वाजता ग्रामपंचायत राजाळे येथे बैठकीत सरपंच संभाजी निंबाळकर व उपसरपंच सौ.अर्चना धुमाळ व हे दोघे गैरहजर असलेने व अजून एक सदस्य शिवाजी शामराव बुदावले हे सुद्धा गैरहजर होते  त्या दोघांना अपात्र ठरवत 10 विरुद्ध 0 असा समजून त्यांचेवर अविश्वास ठराव मंजूर करण्यात येत असल्याचे तहसीलदार विजय पाटील यांनी सांगितले असून चक्क जिल्हा परिषद सदस्य यांचे पतीच्या मनमानीला कंटाळत असल्याने सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा कोण पूर्ण करणार असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

No comments:

Post a Comment