संत मातोश्री सरूताई माउली यांचा पुण्यस्मरण बुधवार पासून, रथोत्सव व पालखी सोहळा दि ३० रोजी - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, September 25, 2018

संत मातोश्री सरूताई माउली यांचा पुण्यस्मरण बुधवार पासून, रथोत्सव व पालखी सोहळा दि ३० रोजी


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

मायणी: माऊलीच्या संगती जीवा लागतो ध्यास'  या उक्ती प्रमाणे संत मातोश्री सरूताई यांचे हजारो भक्त  दि.३० सप्टें रोजी होणाऱ्या सहाव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिम्मित माऊली पुढे नतमस्तक व लीन होण्यासाठी एकत्र येत आहेत. या दिवशी पहाटे ४वाजून ३२मिनिटांनी माउली सरुताईंच्या फुलांची वेळ आहे. मातोश्री सरूताई यांच्या पालखी व रथसोहळ्याचा प्रारंभ मा .सौ उर्मिला येळगावकर व दिलीपराव येळगावकर यांच्या शुभहस्ते होणार आहे.

या सोहळ्यास बुधवार दि. २६ सप्टें पासून सुरुवात होत असून सोहळ्याचा प्रारंभ  'सरूताई लीलाअमृत 'या ग्रंथाचे पारायणाने सुरु होत आहे, यंदा सोहळ्याच्या मुख्य  पालखी व रथसोहळ्या  दिवशी रविवार ३० सप्टेंबर  रोजी 'रिंगण' सोहळा व शैलेश माने यांचा अश्व रिंगण सोहळ्याचे आयोजन  करण्यात आले असल्याची माहिती, संत सदगुरु सरूताई चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव श्री रवींद्र बाबर यांनी दिली.

 ट्रस्ट तर्फे वर्षभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते , यावर्षीही या सोहळ्यात बुधवारी दि२६  रोजी ' सकाळी ९ ते ११.४५ गणेशपूजन,ग्रंथ,विणा, व्यासपीठ, प्रतिमा, ध्वज यांचे पूजन करून,ग्रंथवाचन व नामस्मरणास सुरुवात होणार आहे . दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत मिराबाई महिला भजनी मंडळ माहुली व श्री यांचे  भजन ,४ ते ६ पर्यंत माउली महिला भजनी मंडळ निमसोड यांचे भजन ,रात्री ९ ते ११ कुसूंबीकर ह.भ.प. जौंजाळ महाराज निमसोड ता.खटाव यांचे कीर्तन , रात्री ११ते पहाटे ४ - यशवंतबाबा भजनी मंडळ मायणी भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे.

गुरुवारी दि२७ रोजी  दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत महालक्ष्मी महिला भजनी मंडळ मायणी स्नेहश्री ग्रुप वाई ,४ते ६ वाजेपर्यंत दुर्गामाता महिला भजनी मंडळ कलेढोण  ,"रात्री ९ ते  ११ पर्यंत विशेष असा "  ह भ प सीताराम माळी महाराज कुर्डुवाडी" संत सावता माळी यांचे वंशज" यांचे कीर्तन होणार आहे ." ,रात्री ११ते पहाटे४ वाजता पडळ येथील संत शेकूबादादा भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे.शुक्रवारी दि २८  रोजी सकाळी ९ वाजता ग्रंथवाचन व नामस्मरण ,दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत चौंडेश्वरी भजनी मंडळ कुंडल तर  दुपारी ४ते ६ वाजेपर्यंत स्वरनयनअंध मुलांचा भजन,गवळणी ,भावगीतांचा भक्तिगीतांचा संगीतमय कार्यक्रम होणार आहे  ,रात्री ०९ ते ११ ह.भ.प. बालकीर्तनकार कु. शिवलीला पाटील यांचे  कीर्तन होणार असून रात्री ११ ते ४ पर्यंत इंद्रगिरी प्रासादिक भजनी मंडळ यांचे जागर , तर शनिवारी दि २९ रोजी सकाळी ९ वाजता ग्रंथवाचन व नामस्मरण ,दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत कान्हाई भजनी मंडळ कराड यांचा भजनाचा तर  दुपारी ४ते ६ वाजेपर्यंत ओंकार कल्चरल ग्रुप विटा यांचा " मंगळागौरीचा कार्यक्रम  ,रात्री ०९ ते ११ ह.भ.प. गणेश महाराज डांगे विहापुर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम असून रात्री ११ ते ४ पर्यंत सिध्दनाथ भजनी मंडळ सांगोले ,  या सारखे धार्मिक तथा सांस्कृतिक  कार्यक्रम या चार दिवसांच्या या सोहळ्यात पार पडणार आहेत.

             

रिंगण सोहळा व अश्व रिंगण च्या निमित्ताने किरोली,न्हावी,बुद्रुक,बोरगाव,दुर्गळवाडी,नांदगाव ,कोपर्डे, निसराळे, वारणानागर, टकले बोरगाव,खोजेवाडी,पवारवाडी, पुसेसावळी, करवडी,उंची ठाणे,नलवडेवाडी, तारगाव, बनपुरी, सुर्याचीवाडी, मरडवाक,हिमतपुर, गोपूज , पळशी आदी गावातील हरिजन वारकरी भक्तगण सहभागी होणार आहेत ,तरी सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे ,व आयोजित कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत सदगुरु मातोश्री सरुताई माउली चॅरिटेबल ट्रस्ट  तर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment