न्यू फलटण शुगर्स वर्क्स साखरवाडीच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, September 19, 2018

न्यू फलटण शुगर्स वर्क्स साखरवाडीच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू



विक्रम चोरमले/ फलटण - न्यू फलटण शुगर्स वर्क्स साखरवाडीच्या व्यवहारात प्रांत संतोष जाधव यांनी मध्यस्थी करून 151 कोटी रुपयांना व्यवहार ठरवला परंतु त्याप्रमाणे अद्यापही एकाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे न झाल्याने शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. यानंतर झालेल्या चर्चेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.


प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या सह सर्व संचालक मंडळावर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी केली. राजेंद्र काकडे यांनी ऊस उत्पादक शेतकरी यांना फसवले असल्याने खोटारडेपणा करणाऱ्या राजेंद्र काकडे असल्याने त्याचे वर ही गुन्हा दाखल करा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे. ठरल्याप्रमाणे  पैसे वर्ग न केल्याने राजेंद्र काकडे ही कारखाना प्रशासनाप्रमाणे फसवत आहेत का असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकरी विचारत असल्याने पुन्हा एकदा ऊस उत्पादक शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्र गुन्हे दाखल करण्याच्या मागणीवर ठाम आहे. यामुळे पुढील काळात संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत. कारखान्यावर थकीत कर्जाची बाकी असल्याने स्टेट बँक ऑफ इंडिया कृषी शाखा या बँकेनेही 28 कोटी कर्ज वसुलीसाठी उपविभागीय अधिकारी यांना पत्र दिले आहे. शेतकऱ्याची थकीत देणी देणेबाबत प्रयत्न सुरू असताना बँकेने दिलेल्या पत्रामुळे तिढा वाढला आहे. कर्ज वसुलीसाठी जमीन विक्री लिलाव आदेशावर कार्यवाही सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रांत संतोष जाधव यांनी दिली आहे.


सर्व ऊस उत्पादक शेतकरी हे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जमले असून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून कोणत्या कलमाखाली व कोणा कोणाच्या विरुद्ध तसेच  एकत्रित होणार की व्यक्तिगत गुन्हे दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 



No comments:

Post a Comment