जुगार अड्यावर कारवाईसाठी गेलेल्या फलटण शहर पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला, हल्ल्यात चार पोलीस कर्मचारी जखमी - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, November 15, 2018

जुगार अड्यावर कारवाईसाठी गेलेल्या फलटण शहर पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला, हल्ल्यात चार पोलीस कर्मचारी जखमी

फलटण :- काल दिनांक १४ रोजी रात्री कुंभार टेक, गोसावी वस्ती, मलटण, ता फलटण येथे जुगार अड्यावर छापा मारल्यानंतर शासकीय कामकाज करत असताना २० ते २१ जमावाने पोलीस कर्मचाऱ्यांवर दगड व विटाने केलेल्या हल्ल्यात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात पुरुष व महिलांसह सुमारे २० ते २१ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, काल दिनांक १४ रोजी ८ वाजून ४० वाजता कुंभार टेक गोसावी वस्ती मलटण ता फलटण येथे अवैद्य जुगार अड्डा चालू असल्याची माहिती फलटण शहर पोलीस मिळाली होती. त्या माहितीच्या अनुषंगाने फलटण शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी वरील ठिकाणी छापा मारण्याचा प्रयत्न केला असता, या ठिकाणी मोठा जमाव जमला या जमावाने पोलीस कारवाईत अडथळा निर्माण केला. पोलिसांनी यावेळी पोलीस बाळाचा वापर केला असता १) संतोष जगन्नाथ घाडगे रा.बिरदेवनगर, फलटण ता.फलटण जि. सातारा २) किरण विजय घाडगे रा. जिंती नाका मलटण फलटण ३)जीवन विक्रम घाडगे रा. तुपरी वसाहत ता.पलुस जि. सांगली ४)उज्वला युवराज घाडगे रा. कुंभार टेक महतपुरा पेठ मलटण ५)अंजू संजय वाघमारे रा.कोथरूड डेपो संगमनगर पुणे ६)बबीता शिवाजी मोरे रा. काले ता.कराड जि. सातारा ७)कमल रामराव जुवेकर रा.आजाद नगर झोपडपट्टी गंगाराम टाकीजवळ पनवेल जि. रायगड ८)युवराज जगन्नाथ घाडगे ९)विजय जगन्नाथ घाडगे १०) किरण जगन्नाथ घाडगे ११)मीना विजय घाडगे १२)रेश्मा किरण घाडगे ८ ते १२ रा. कुंभार टेक महतपुरा पेठ मलटण ता.फलटण जि.सातारा व १३)नाना बाळू जाधव रा.महतपुरा पेठ मलटण ता.फलटण जि. सातारा तसेच वरील आरोपी व त्यांच्या सोबत असलेले अनोळखी सात ते आठ महिला व पुरुष यांनी पोलीस कर्मचारी यांना हातात दगड व विटा घेऊन शिवगाळ दमदाटी केली व बाळू नाना जाधव याने सदर जमावाला भडकवून पोलीस कर्मचाऱ्यांवरती दगड व विटा फेकून मारल्या या घटनेत पोलीस हवालदार काकडे, पोलीस शिपाई दडस, पोलीस हवालदार सोनवलकर,व पोलीस हवालदार येळे हे पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. याबाबतची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर अशोक दळवी यांनी दिली असून सर्व आरोपींच्या विरोधात भादविस कलम ३५३,३३२,१४३,१४७,१४८,१४९,१०९, मुंबई जुगार कायदा कलम १२ व मुंबई पोलीस कायदा कलम ३७-१-३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ४ महिला व ४ पुरुष असे मिळून ८ संशयितांना अटक करण्यात आली असून, इतर संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. फलटण शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बुरसे अधिक तपास करीत आहेत.





1 comment:

  1. कोणी तरी हप्ता घेत आसेल
    मग कारवाई केल्यावर अस होणार

    ReplyDelete