सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहीतेची आत्महत्या - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, November 14, 2018

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहीतेची आत्महत्या


सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क

ढेबेवाडी:- सासरच्याकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासास कंटाळून  विवाहीतेने राहत्या घराच्या छताला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना. कुंभारगाव (माटेकरवाडी) तालुका पाटण येथे सोमवार दिनांक 12 रोजी घडली. पुनम संतोष माटेकर वय- 26 असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती संतोष आनंदा माटेकर वय- 30 व सासू सासरे,दीर,जाऊ सर्व  रा. माटेकरवाडी याच्याविरोधात ढेबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या बाबत ढेबेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत पूनम संतोष माटेकर यांना वारंवार फोनवर बोलत असतेस तसेच तू नीट वागत नाही  काम करत नाहीस असे म्हणून वारंवार शिवीगाळ करून पती संतोष माटेकर  ,सासरे आनंदा माटेकर,सासू लक्ष्मी माटेकर, दीर शंकर माटेकर जाऊ जयश्री माटेकर हे सर्व सासरचे मंडळी वारंवार मानसिक व शारीरिक छळ करत होते,परंतु मयत पूनम माटेकर या तो त्रास सहन करून नांदत होते,परंतु सासरचे लोक त्रास देत होते, सासरे व सासरच्या मंडळींनी पती संतोष माटेकर यांच्यापासून मयत पूनम यांना जाणूनबुजून वेगळे  ठेवले होते व नंतर काही दिवसांनी पती संतोष हा मुंबईत निघून गेला,व जुन्या घरात मयत पूनम हिला एकटीला राहण्यासाठी ठेवले होते, व सासू सासरे दीर जाऊ अशी सर्व सासरची मंडळी एकत्र नवीन घरात राहत होते,शिवाय सासरचे लोक पूनम हिला वारंवार शिवीगाळ करत वाईटसाईत बोलत मानसिक व शारीरिक  त्रास देत होते,व त्यांच्या त्रासाला कंटाळून पूनम हिने स्वतः गळफास लावून घेतला असून,  पती संतोष माटेकर सासू लक्ष्मी माटेकर,सासरे,आनंदा माटेकर,दीर शंकर माटेकर,जाऊ जयश्री माटेकर सर्व राहणार माटेकरवाडी यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल मयत पूनम माटेकर यांच्या आई पारुबाई पांडुरंग सावंत रा.सावंतवाडी (काळगाव) यांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्या असल्याची ढेबेवाडी पोलिसांनी सांगितले , घटनेचा तपास सपोनि उत्तम भजनवळे करत आहेत.

No comments:

Post a Comment