Hot Posts

6/recent/ticker-posts

फलटण येथे डॉ संजय राऊत यांचे खंडणीसाठी अपहरण

सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क

फलटण - येथील प्रसिद्ध डॉक्टर संजय राऊत यांचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले असून स्वतः डॉ संजय राऊत यांनी अपहरण झाल्यानंतर त्यांच्या मोबाईल वरून हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मॅनेजरला ४ ते ५ कोटी रुपयांची जुळवाजूळव कर असे सांगितले. याबाबत प्रशात बाळासो शेलार यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


याबाबत फलटण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण येथे दि १९ रात्री १० वाजण्याच्या सुमारास डॉ संजय कुष्णाजी राऊत वय ५४  हे त्यांचे मोटार सायकल क्रमांक एम एच ११ बी जी ५५१८ होन्डा कपंनीच्या शाईन या मोटार सायकल वरुन लाईफ लाईन हॉस्पीटल येथुन राहत्या घरी रामराजे नगरकडे जात असतांना चार चाकी वाहनातून आलेल्या अज्ञात आरोपीनी डॉ संजय राऊत यांना चाकी वाहनात अपहरण करून घेवून गेले व जाताना सोबत त्यांची मोटार सायकल घेऊन गेले. यानंतर रात्री १०-५० वाजता डॉ संजय राऊत यांनी त्यांचे मोबाईल क्रमांकावरुन हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मॅनेजरला मोबाईलवर फोन करुन ४ ते ५ कोटी रुपये मध्यरात्री पर्यत जुळवाजूळव कर असे सांगितले. याबाबत दि २० रोजी प्रशात बाळासो शेलार वय ३० धंदा - सिध्दनाथ हॉस्पीटल मॅनेजर रा मठाचीवाडी ता फलटण जि सातारा यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात डॉ संजय राऊत यांचे खंडणीसाठी अपहरण केल्याबाबतचा गुन्हा दाखल केला आहे.


या घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधीक्षक डॉ.अभिजित पाटील व फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी डॉक्टर संजय राऊत यांच्या शोधासाठी  पथके रवाना केली आहेत.



Post a Comment

0 Comments