खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या डॉ संजय राऊत यांची सुटका, तीन आरोपींना अटक - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, February 20, 2019

खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या डॉ संजय राऊत यांची सुटका, तीन आरोपींना अटक

सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क


फलटण -  खंडणीसाठी येथील प्रसिद्ध डॉक्टर संजय राऊत यांचे अपहरण करणाऱ्या आरोपींना शोधण्यात पोलिसाना यश आले असून डॉ संजय राऊत यांची सुटका करून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अवघ्या काही तासात या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.



याबाबत फलटण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,  दि १९ रात्री १० वाजण्याच्या सुमारास डॉ संजय कुष्णाजी राऊत हे या मोटार सायकल वरुन लाईफ लाईन हॉस्पीटल येथुन राहत्या घरी रामराजे नगरकडे जात असतांना चार चाकी वाहनातून डॉ संजय राऊत यांचे अपहरण करण्यात आले होते. यानंतर रात्री १०-५० वाजता संजय राऊत यांनी त्यांचे मोबाईल क्रमांकावरुन हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मॅनेजरला मोबाईलवर फोन करुन ४ ते ५ कोटी रुपये मध्यरात्री पर्यत जुळवाजूळव कर असे सांगितले होते. यानंतर या घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधीक्षक डॉ.अभिजित पाटील व फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी डॉक्टर संजय राऊत यांच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. पोलिस पथकाने सदर पथकाने आरोपीचा ठाव ठिकाणा शोधून मोठ्या शिताफीने या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून यात समावेश असणाऱ्या अन्य आरोपीचा शोध सुरू आहे. अवघ्या काही तासात अपहरण करण्यात आलेल्या डॉ संजय राऊत यांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.

No comments:

Post a Comment