२० फेब्रुवारी रोजी फलटण शहरात महास्वच्छता अभियान - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, February 19, 2019

२० फेब्रुवारी रोजी फलटण शहरात महास्वच्छता अभियान

सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 

फलटण -- फलटण नगरपरिषद व अरोहनम यांच्या संयुक्त विद्दमाने विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत बुधवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी  सकाळी ७ते १० वाजेपर्यंत फलटण शहरात महास्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले असून या अभियानात फलटणकर नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन फलटण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. नीताताई मिलिंद नेवसे  यांनी केले आहे. सदर अभियानात फलटणकर नागरिकांसह कमिन्स इंङिया चे ६०० हून अधिक अधिकारी व कर्मचारी सहभागी होऊन फलटण शहर स्वच्छ करण्यास हातभार लावणार आहेत. या स्वरुपातील अभियान व घनकचरा व्यवस्थापनात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध जनजागृती पर कार्यक्रम वर्षेभर आयोजित करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात शंकर मार्केट, अधिकारगृह, शहर पोलीस ठाणे,ग्रामिण पोलीस ठाणे, मुधोजी कॉलेज एसटी स्टॕङ आदी २० ठिकाणी महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.



या महास्वच्छता अभियानाचा प्रारंभ सकाळी ७ वाजता अधिकारगृह येथे  विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात येणार असून यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण, मार्केट कमिटीचे चेअरमन श्रीमंत रघूनाथराजे नाईक निंबाळकर, जेष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे सदस्य श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर,  उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे मुख्याधिकारी प्रसाद काटकर नगरपरिषदेचे सर्व विषय समितींचे सभापती नगरसेवक नगरसेविका सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित राहणार आहेत तरी फलटणकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे आरोग्य सभापती अजय माळवे यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment