बापानेच केला भाग्यश्रीचा घात ? बापास अटक - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, February 9, 2019

बापानेच केला भाग्यश्रीचा घात ? बापास अटक


सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क

पाटण /प्रतिनिधी -- भाग्यश्री संतोष माने (रा. करपेवाडी, ता. पाटण, मूळ राहणार कार्वे, ता. कराड) या महाविद्यालयीन युवतीचा तिच्याच बापाने घातपात केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी रात्री संतोष माने यास ढेबेवाडी पोलिसांनी गजाआड केले आहे.


दरम्यान,  याप्रकरणी दोन मांत्रिकाकडे चौकशी सुरू असल्याने अंधश्रद्धेतून भाग्यश्री मानेला आपला जीव गमवावा लागला का ? याचा पोलिस शोध घेत आहेत. करपेवाडी ते तळमावले या गावच्या हद्दीतील देसाई शेत या शिवारालगतच्या उसाच्या शेतामध्ये अज्ञाताने गळा चिरुन भाग्यश्री माने हिचा निर्घृण खून केल्याची घटना गेल्या महिन्यात मंगळवार, २२ जानेवारीला उघडकीस आली होती. संबंधित युवती तळमावले (ता. पाटण) येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात बारावीच्या वर्गामध्ये शिकत होती. नेहमीप्रमाणे ती कॉलेजला गेली होती. मात्र कॉलेज सुटून ती घरी परत न आल्यामुळे घरातील लोकांनी शोधाशोध सुरु केला. ती ज्या ज्या रस्त्याने जाते, त्या त्या रस्त्याने शोध घेतला असता दुपारी तीनच्या सुमारास करपेवाडी व गावच्या हद्दीतील उसाच्या शेतामध्ये ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसल्याचे भाग्यश्रीच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले होते.


भाग्यश्री माने यांच्या खून प्रकरणातील संशयितांना गजाआड न केल्याने 1 फेब्रुवारी रोजी सातारा जिल्ह्यात नाभिक समाज बांधवांनी बंद पाळत निषेध मोर्चे काढले होते.  त्याचबरोबर संशयित गजाआड न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला होता. मात्र आता या प्रकरणात नाट्यमय वळण लागले असून भाग्यश्रीच्या खुनात कोणा कोणाचा सहभाग आहे ? याचा पोलिस शोध घेत आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.याप्रकरणी ढेबेवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे पुढील तपास करत आहेत.






No comments:

Post a Comment