Hot Posts

6/recent/ticker-posts

करंजे येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

 

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 

सातारा :- करंजे येथील युवक संजय कृष्णाजी किर्दत या युवकाने सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरातील पत्र्याच्या शेडमध्ये ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.



संजय किर्दत यांचे करंजे येथे किराणा मालाचे दुकान होते. तसेच ते रिक्षा चालवण्याचा व्यवसाय देखील करत होते. परंतु काही दिवसांपूर्वी त्यांची रिक्षा थकीत कर्जामुळे बँकेने ओढून नेली होती त्यामुळे संजय किर्दत हे नैराश्यामध्ये होते . त्यांचे थोरले बंधू तानाजी कीर्दत यांनी त्याला दिलासा दिला होता .तू कर्जाचे कसलेही टेन्शन घेऊ नको मी रिक्षा सोडवुन आणतो असे ते त्याला वारंवार सांगत होते . सकाळी नेहमीप्रमाणे संजय किर्दत यांनी दिनचर्येला सुरुवात केली .त्यामुळे कुटुंबातील कोणालाही ते आत्महत्या करतील असे वाटले नव्हते .परंतु सकाळी अकरा वाजता घराच्या पहिल्या मजल्यावर जाऊन त्यांनी ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली . किर्दत कुटुंबीयांचा करंजे येथे चांगला जनसंपर्क आहे. तसेच विविध सामाजिक कार्यात किर्दत कुटुंबीय हे नेहमी पुढे असतात. संजय किर्दत यांचा मृत्यूमुळे करंजे येथील अनेकांना मानसिक धक्का बसला . संजय किर्दत यांचे मोठे बंधू तानाजी कीर्दत यांचे सांत्वन करण्यासाठी सामाजिक व राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. सायंकाळी माहुली येथे संजय किर्दत यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले 

Post a Comment

0 Comments