पळसगाव मध्ये काका की पुतण्या वरचढ ठरणार - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, March 24, 2019

पळसगाव मध्ये काका की पुतण्या वरचढ ठरणार


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
कातरखटाव: खटाव तालुक्याच्या पूर्व भागातील पडळ, पळसगाव  व येलमरवाडी येथील ग्राम पंचायत च्या सार्वत्रिक निवडणुका साठी आज शांततेत व चुरशीने मतदान झाले. पळसगाव मध्ये थेट सरपंच पदासाठी सख्खे काका - पुतणे समोरा समोर उभे ठाकल्याने यात काका की पुतण्या ची सरशी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
 . या बाबत अधिक माहिती अशी:  खटाव तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण असणार्या पडळ , पळसगाव व यलमरवाडी  या तीन गावच्या सार्वत्रीक ग्रामपंचायत निवडणुका आज पार पडल्या. येलमरवाडी येथील दोन तर पळसगाव येथील एक जागा यापूर्वीच  बिनविरोध झाल्या आहेत.तिन्ही ठिकाणी  थेट सरपंच पदासाठी वउर्वरित जागांसाठी स्थानिक दोन  पॅनेलमध्ये सरळ लढत असल्याने चुरस दिसून आली.सकाळच्या सत्रात मतदान धीम्या गतीने सुरू होते. मात्र दहानंतर मतदारांनी रांगा लावल्याचे दिसून आले. कामाधंद्या निमित्त मुंबई - पुण्यात असणार्या मतदारांनी ही मतदानासाठी हजेरी लावल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.  मतमोजणी  उद्या वडूज येथे होणार आहे.

No comments:

Post a Comment