म्हसवड
म्हसवड येथील नामांकित असलेल्या मेरीमाता हायस्कूल व ज्युनिअर काँलेज म्हसवड या शाळेच्या कार्यालयाच्या ड्राँव्हर मध्ये विद्यार्थ्यांची जमा झालेली सुमारे तिन लाख सत्तावीस हजार रुपयेची फी आज शनिवार रोजी पहाटे अज्ञात चार चोरट्यानी कटावणी व कटरच्या सहाय्याने दरवाज्याच्या कड्या व ड्रँव्हरचे लाँक तोडून चोरी केली असुन हे चार हि चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असुन संशयीत म्हणून म्हसवड पोलिसांनी दोघांंना चौकशीसाठी ताब्यात घेतले असुन तपासासाठी सातारा श्वान पथक व फिंंगर प्रिन्ट एक्सपर्ट यांनी तपास केला असुन अधिक तपास म्हसवड पोलीस करत आहेत
या बाबत म्हसवड पोलिस ठाण्यात मेरीमाता हाय.व ज्युनि. काँलेजचे प्राचार्य
फादर एमेल अब्राहम व मँनेजर ईब्राई जोशेफ यांनी तक्रार दिली आसुन या
तक्रारीत म्हटले आहे की आज शनिवारी सकाळी नेहमी प्रमाणे प्रशालेच्या
आवारात असलेल्या खोलीतुन प्रार्थना करुन प्रशाला भरण्याच्या आधी खोली मधुन
बाहेर येवून माझ्या केबीनकडे मी व राजु नामक कर्मचारी जात असताना
दरवाज्याचे कुलूप खाली पडले असल्याचे राजुने सांगीतल्यावर मी आँफीस मध्ये
गेलो तर कार्यालयातील कागद पत्रे लाकडी ड्राव्हर मधुन बाहेर काढून
आस्ताव्यस्त टाकली होती तर ज्या ड्रँव्हर मध्ये ३ लाख २७ हजार ठेवले होते
ते पैसे घेऊन चोरटे पसार झाले आहेत या बबत तक्रार पोलिसात दिल्या नंतर
सपोनि मालोजीराव देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पहाणी केली व फिंगर
प्रिंट क्सफर्ड एपीआय कोळी व सातारा श्वान पथकाचे श्वान हस्तक सुरज नडे
यांनी येवून तपास केला असता पूर्वीच्या बाजुच्या ज्या भितीवरुन चोरटे आले व
गेले त्या भिती पर्यंतच श्वान घिरट्या घालत होते तर पोलीस माणगंगा नदी
पर्यंत गेले मात्र ठोस असे पुरावे चोरट्यानी सोडले नव्हते मात्र या
चोरट्या पैकी एका चोरट्याच्या तोंडावर बांधलेला रुमाल खाली पडल्याने
चोरट्याचा चेहरा स्पष्ट दिसत आहे त्याचा पोलीस शोध घेत आहे तर या घटनेतील
संशयीत म्हणून म्हसवड पोलिसांनी एकाला तपासासाठी ताब्यात घेतले असुन अधिक
तपास म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि मालोजीराव देशमुख करत आहेत

0 Comments