Hot Posts

6/recent/ticker-posts

क्रेन अंगावर पडुन एकजण ठार

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
रहिमतपुर: 
कठापुर ता.कोरेगांव येथे बारा टन वजन उचलण्याची  क्षमतेची क्रेन अंगावर पडुन एकजण ठार  
   याबाबत रहिमतपुर पोलिसांनी दिलेली माहिती अशी कठापुर येथे रविराज इंजिनियरींग अँड  फॅब्रीमेक कंपनीचे फॅब्रीकेशनचे काम सुरू होते. प्रकल्पाकरिता पाणी थांबवण्यासाठी गेटचे वेल्डींचे काम झाल्यावर कलर करण्यासाठी क्रेन च्या साहय्याने दुसऱ्या ठिकाणी नेत असताना हेल्परचे काम करणारे बिहार येथील गणपत सिता साह वय  ५३ सध्या रा. कठापुर क्रेनला दिशा  दाखवत होते.
   सदरचा रस्ता एका बाजुने उताराचा असलेने  क्रेन चा  वळणावर उताराच्या दिशेने तोल जावुन गणपत साह.यांच्या अंगावर पलटी झाल्याने जागीच मयत झाले याबाबत क्रेनचालक विजयकुमार छक्कनलाल पटेल वय२१  रा. चुप्पेपुर ,उत्तरप्रदेश  याच्याविरुध्द  नाविद शायर मोमिन यांनी रहिमतपुर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास  हवालदार कांबळे करत आहेत.
 

Post a Comment

0 Comments