Hot Posts

6/recent/ticker-posts

सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
कराड:  सहकार मंत्री व पालकमंत्री बाळासाहेब पाटील चेअरमन असलेल्या सातारा जिल्ह्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.
निवडणुकीसाठी सुमारे 125 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आज दि. 28 अखेरच्या दिवशी 21 जागांसाठी केवळ 21 जणांचे अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.
सह्याद्री कारखान्याचे कार्यक्षेत्र सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कराड, सातारा, खटाव, कडेगाव आणि कोरेगाव अशा पाच तालुक्यात आहे. यात सुमारे 36 हजार 100 सभासद आहेत.
निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सभासदांनी टाकलेला विश्‍वास सार्थ ठरवत भविष्यात कारखान्याची उपसा जलसिंचन योजना पूर्ण करण्यास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही दिली आहे. तसेच कारखान्यातील विस्तार वाढ केली जाणार असल्याचे मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments