Hot Posts

6/recent/ticker-posts

डोळेगाव सोसायटीवर अजिंक्य पॅनेलचा झेंडा

 
वाघेश्वरी पॅनेलचा धुव्वा
सातारा:  संपूर्ण सातारा तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि अटीतटीच्या ठरलेल्या डोळेगाव विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत अजिंक्य पॅनेल ने विरोधी वाघेश्वरी परिवर्तन पॅनेलचा दारुण पराभव केला. अजिंक्य पॅनेलने सर्व १३ जागा मोठ्या फरकाने जिंकून  वाघेश्वरी परिवर्तन पॅनेलचा धुव्वा उडवला. 
   सातारा शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोसायटीचे चेअरमन सोमनाथ गोडसे यांच्या नेतृत्वाखाली अजिंक्य पॅनलचे सर्व उमेदवार 65 ते 80 मतांच्या फरकाने विजयी झाले. अजिंक्य पॅनेलचे कदम शंकर,गोडसे तुकाराम, गोडसे रवींद्र, गोडसे रामचंद्र, गोडसे साहेबराव, गोडसे संतोष, शेलार कृष्णत,शेलार  विष्णू , गोडसे नलिनी, गोडसे पारुबाई, रणदिवे जगन्नाथ, कदम नारायण, शेलार प्रविण हे उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारांचा आ. भोसले यांनी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विक्रम पवार, सोमनाथ गोडसे यांच्यासह पॅनेल प्रमुख गोरख गोडसे, अमित गोडसे, सोपान शेलार, सत्यवान गोडसे, गोकुळ गोडसे, लक्ष्मण गोडसे, रामदास शेलार, प्रवीण काळंगे, प्रताप गोडसे, राजेंद्र गोडसे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments