सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: सराईत चोरटयाकडुन मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड करण्यात शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून शुभम दीपक कडव, रा. आझादनगर असे चोरट्याचे नाव आहे.
शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील एक दुचाकी अज्ञात इसमाने चोरुन नेल्याची बाबतची तक्रार प्राप्त झाली होती.
या गुन्ह्याचा तपास सुरु असताना दि. 3 रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचारी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना. मोळाचा ओढा सातारा येथे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार शुभम दीपक कडव रा - आझादनगर कॉलनी , मोळाचा ओढा सातारा हा विना नंबरची दुचाकी घेऊ मेढा बाजूस जात असताना दिसला. संशय आल्याने पोलिसांनी त्यास थांबण्यास सांगितले. परंतु तो पळुन जाऊ लागला. म्हणून पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. त्यास मोळाचा ओढा चौकात थांबवून त्याच्या ताब्यात असलेल्या दुचाकीबाबत विचारपूस केली असता तो प्रथम उडवा उडवीची उत्तरे देवु लागला. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवित कौशल्याने तपास करता त्याने नमुद गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याचेकडुन गुन्ह्यातील चोरीस गेलेली स्प्लेंडर दुचाकी असा एकुण 15 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आला. त्याला अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस नाईक पंकजा जाधव हे करीत आहेत.

0 Comments