सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
मुंबई:
करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज
मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. त्यावर सविस्तर चर्चा झाली. मात्र, सरकारी
कार्यालये बंद करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, असं स्पष्टीकरण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं. तसंच लोकल आणि बससेवा अत्यावश्यक असल्यानं बंद होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
'या' २३ गाड्या रद्द
करोनाचा धोका लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेत राजधानी, डेक्कन, प्रगती, दुरांतो एक्स्प्रेससह एकूण २३ मेल-एक्स्प्रेस रद्द केल्या आहेत. करोना संसर्ग टाळणे आणि प्रवासी संख्या कमी असल्याचे कारण देत मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत या गाड्या रद्द राहणार आहेत.

0 Comments