सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
येरळवाडी: उपविभागिय पोलिस अधिकारी बी बी महामुंनी यांचे आदेशानुसार पो उ नि श्रीमती एस ए पालेकर याच्या पथकाने खातवळ गावचे हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा मारला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसर खातवळ गावचे हद्दीत सुलकी नावाचे शिवारात डोंगरावर बाभळीचे झाडाखाली मोकळ्या जागेत बेकायदेशीर पने,पत्याचे डावावर पैसे स्वीकारुन ,पाणी पत्त्याचा जुगाराचे डाव सुरु होता ,या ठिकाणी छापा टाकला असता,आरोपी नावे सत्यवान हणमंत मुंढे वय 35 रा पडलं आंकलश लक्ष्मण दुबळे वय 40 कातर खटाव, विठ्ठल नामदेव बागल वय 59 कातर खटाव चंद्रप्पा भीमाप्पा गाडीवदंडार वय 55 रा खातवळ, मूळ रा विजापूर, शशिकांत कोंडीबा चिंचकर वय 43 रा कातर खटाव, जनार्धन चंद्रकांत नलावडे वय 42 रा कातर खटाव गणेश कल्याण खिलारे वय 42 रा मायणी ,कालिदास बाबुराव मोहिते वय 65 रा आनफळे,रामचंद्र गंगाराम मोहिते वय 68अन फळे मायणी,प्रताप किसन जगदाळे वय 45 पेडगाव ,किसन जगनाथ केंगर वय 46 पॅडळ या सेर्वाना ताब्यात घेणेत आले असून सदर छाप्यामध्ये एकूण रोख रक्कम रूपये 11970/ व साधनांमध्ये 36800 रूपये किमतीचे मोबाईल,व जुगारावर आणलेल्या वाहनांमध्ये 3,65000/रुपये किमतीच्या 9 मोटार सायकलीअसा एकूण 4,13,770/रूप ये किमतीचा मुद्दे माल मिळून आला असून पो ना अमोल माने उ वि पो अधिकारी कार्यलय दहिवडी विभाग यांनी फिर्याद दिली असून ,याबतचा तपास पोलीस हवालदार ओंबसें करीत आहेत

0 Comments