सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
म्हसवड: माण तालुक्यातील अवैध वाळू उपशाबाबत माणखटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी विधानसभा अधिवेशनामध्ये पोटतिडकीने आपले मत व्यक्त केले.अवैध वाळू उपसा बंद झालाच पाहिजे मात गंगा वाचली पाहिजे याबाबत दुमत नाही.मात्र गेल्या १० वर्षात माणमधील वाळू उपशाला कोणाचे राजकीय पाठबळ मिळाले. आताच नक्की साक्षांतकार कसा काय झाला पंधरा दिवसात आमदार महोदयांना वाळू उपसा दिसू कसा लागला. गेल्या १० वर्षात दिसला नाही का या वाळू उपशामुळे अनेक तरुण वाळूत पैसे मिळतात म्हणून चैनीसाठी व पॅकेट मनीसाठी या व्यावसायातुन गुंडगिरीकडे वळाले असल्याने गुंडागिरी फोफावली ,याला जबाबदार कोण असा सवाल शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे.
माण तालुक्यात राजरोसपणे अवैध वाळू उपसा सुरू आहे.वाळू उपसा करणारे सर्वसामान्य लोक नाहीत.तर ते राजकीय पुढाऱ्यांचे कार्यकर्ते आहेत.मात्र गेल्या दहा वर्षात संपूर्ण माणगंगा नदी पात्रातील ,तालुक्यातील आंधळी धरण, लहान-मोठे ओढे ,बंधारे ,तलाव या ठिकाणची वाळू कोठे गेली,कोणाच्या कार्यकर्त्यांनी नेली ,कोणाचे राजकीय पाठबळ मिळाले याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.तसेच सातारा - पंढरपूर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असताना त्याचा सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून कोण काम करत आहे .शंभर वर्षापूर्वीची दोन्ही बाजूची झाडे काढली मात्र त्याजागी नवीन झाडे लावली जात नाहीत.त्या कामाकडे डोळेझाक का केली जात आहे.जलयुक्त शिवार ,साखळी सिमेंट बंधारे ,कृषी खात्याची , पाणलोट ,पाणी फौंडेशनची कामे कोणत्या दर्जाची होती.तालुक्यातील रस्ते दोन महिन्यातच कसे उखडतात याकामाबाबतही आमदार महोदयांनी लक्ष घालावे अशी मागणीही अनिल सुभेदार यांनी केली आहे.

0 Comments