Hot Posts

6/recent/ticker-posts

माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे निधन


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण  :- माढा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे वडील सातारा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचे पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सुरु असताना रविवारी  सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

 गेल्या काही दिवसापासून पुणे येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते आज सकाळी निधनाची वार्ता समजताच आदरांजली म्हणून आज फलटण शहरामध्ये उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला आहे.

१९९६ साली ते सातारा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडून आले होते.  सातारा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडून येणारे ते पहिले उमेदवार होते. फलटणनगरीचे नगराध्यक्षपद त्यांनी भूषविले होते तसेच सातारा जिल्हा शिवसेनेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. फलटण येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेचे ते चेअरमन होते. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी २२ दिवस पदयात्रा काढून महाराष्ट्रातील राजकारणाता त्यांनी खळबळ माजवून दिली. तसेच लोकसभेमध्येदेखील त्यांनी पाणी प्रश्नावर आवाज उठवला. त्यांच्या या प्रयत्नामुळे कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि सातारा जिल्ह्यातील धरणाची कामे पूर्ण होण्यास मदत झाली.

रविवारी सकाळी 11 ते 3 पर्यंत त्यांचे पार्थिव फलटण येथील हडको येथे त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून सायंकाळी 4 वाजता त्यांच्यावर फलटण येथील आईसाहेब नगर मलठण याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांच्या पश्‍चात पत्नी,  माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, फलटण नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते समशेर नाईक-निंबाळकर हे दोन मुलगे, स्नुषा जि. प. सदस्या जिजामाला नाईक-निंबाळकर, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments