Hot Posts

6/recent/ticker-posts

बाहेरगावावरून येणा-या प्रत्येकाची होणार आता पोलीसपाटलांच्याकडे नोंद

जिल्हाधिका-यांचे पोलीस पाटलांना आदेश
वेळे : दिनांक १९ : वार्ताहर
 आपल्या देशात झपाट्याने पसरत असलेल्या कोरोना व्हायरस पासून संरक्षणासाठी घ्यावयाच्या खबरदारीसाठी सर्वतोपरी प्रशासकीय यंत्रणेकडून सतर्कतेचे प्रयत्न सुरु आहेत. याचच भाग म्हणून ज्या ठिकाणी समाज एकत्र येवू शकतो अश्या सर्व प्रकारच्या कार्यक्रम व घटनांच्यावर शासनाने बंदी घातली आहे किंवा गर्दी टाळून योग्य त्या उपाययोजना घेण्याची खबरदारी घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून दिनांक ३१ मार्चपर्यंत सर्व शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. प्रशासकीय महत्वाची कामे वगळता सर्व प्रकारचे खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसायसुद्धा पुढील सूचना मिळेपर्यंत ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आलेले आहेत.
जवळजवळ १५ दिवसांचा कालावधी यासाठी मिळालेला असल्याने विद्यार्थी व कामगारवर्ग सुट्टीवर असल्यासारखाच आहे. शासनाचा उद्देश या लोकांनी आपापल्या घरात बसून रहावे व जेणेकरून यामधून करोना व्हायरसचा संसर्ग टळेल असा असला तरी १५ दिवसांची सुट्टी असल्याने बरेचसे चाकरमानी व विद्यार्थी आपापल्या गावी परतत आहेत. मात्र आत्तापर्यंत बाहेरून आलेल्या लोकांच्या आरोग्य तपासणी बाबत कोणतेही निर्बंध नसल्याने कदाचित एखादा संसर्ग झालेला व्यक्तीपासून बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. या गोष्टीचा विचार करून जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व गावच्या पोलीस पाटील यांना निर्देश दिले आहेत व यानुसार सर्व ग्रामस्थांना सूचित करणेत आलेले आहे की जर कोणी व्यक्ती आपल्या गावामध्ये परदेशातून तसेच पुणे मुंबई / कोरोना बाधित प्रदेशातून गावात येत असेल तर नागरिकांनी खबरदारी घेवून अश्या व्यक्तीची नोंदणी दररोज तातडीने आपल्या गावाच्या पोलिस पाटील यांचेकडे सदर व्यक्तीच्या नाव,पत्ता व फोन नंबर सहीत करायची आहे. तसेच त्या व्यक्तीची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करून घ्यावयाची आहे. यामुळे जर एखादा बाधित व्यक्ती असेल किंवा संशयित व्यक्ती असेल तर तत्याच्या पुढील तपासणी तातडीने करण्याची व्यवस्था करण्यासाठी हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे.
चौकट : हा एक खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने आदेशीत केला आहे. याद्वारे निष्काळजीपणा न करता सर्व ग्रामस्थांचे आरोग्य सांभाळले जाऊन कोरोना व्हायरस नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपयायोजना करण्यास मदत होईल व प्रत्येकाने सामाजिक बांधीलकी ज

Post a Comment

0 Comments