आरोग्यवर्धिनी पुरस्कार ज्योती मोहिते यांना प्रदान करताना सुनीशा शहा,वर्षा भोसले सोबत हेमा निकम,अश्विनी भारती,शिल्पा कुलकर्णी
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: येथील आरोग्यातून सौंदर्याकडे जाण्याचा राजमार्ग ठरलेल्या संजीवनी लेडीज फिटनेस सेंटर मार्फत महिला दिनाचे औचित्य साधून "आरोग्यवर्धिनी पुरस्कार " वितरण समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलताना नारीशक्ति फौंडेशनच्या अध्यक्षा सुनिशा शहा यांनी वरील गौरवउदगार काढले त्या पुढे म्हणाल्या हे लेडिज फिटनेस सेंटर संचालीका वर्षा राजेश भोसले यांच्या मार्गदर्शना नुसार गेली १७ वर्ष महिलांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरले आहे.अनेक महिलांनी याचा लाभ घेतला आसून याठिकाणी महिलांना कौटुंबिक वातावरणात मानसिक आणी शारीरिक आरोग्यासाठी व्यायामाची आवड निर्माण करून महिला सबलीकरणाचा भक्कम पाया रचला आहे.१५ वर्षापासून ७० वर्षापर्यंंतच्या महिला या फिटनेस सेंटरच्या सदस्या आहेत ही बाब निश्चित कौतुकास्पद आहे.समारंभाचा शुभारंभ दिपप्रज्वलाने झाला.तदनंतर २० किलो वजन कमी केलेल्या निशा बहुआ ,बीएसएनएलच्या अश्विनी भारती व जेष्ठ माहिला सदस्या ज्योती पोपट मोहिते यांना आरोग्यवर्धिनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.समारंभाचे प्रास्ताविक व स्वागत वर्षा भोसले शिल्पा कुलकर्णी यांनी तर सूञसंचालन हेमा निकम यांनी केले.कार्यक्रमात "हर दिन महिला दिन" चा संदेश देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी अर्चना कदम, सीमा मोरे ,नंदिनी भोसले ,समता जीवन ,वर्षा भागवत , अंजली भोसले यांच्यासह महिलांची बहुसंख्येने उपस्थिती होती.


0 Comments