Hot Posts

6/recent/ticker-posts

जिहे कटापूर योजनेस 537 कोटी रुपये मंजूर, आमदार-खासदार जोडीचे यश

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
दहिवडी / प्रतिनिधी
 मान खटाव तालुक्यातील कायम दुष्काळी तालुक्यातील वरदानी ठरणारा व महत्त्वकांक्षी जिहे कटापूर योजना या योजनेस केंद्रीय जलशक्ती मंत्रालय यांनी१९/२/२०२०  रोजी  537 कोटी रुपये दिले , केंद्रीय जलशक्ति मंत्रालयाचे सदस्य व माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्या सातत्याने पाठपुराव्यामुळे यास यश आले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मान खटाव मतदारसंघातल्या जनतेला दिलेला शब्द यानिमित्ताने पाळला गेला या योजनेमुळे मान खटाव तालुक्यातील ६७ गावांचा पिण्याच्या पाण्याचा व शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी आता निकाली निघालेला आहे या योजनेमुळे या ६७ गावांमधील हजार २७५०० हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून कायमस्वरूपी चा दुष्काळाचा कलंक या निमित्तानं पुसला जाणार आहे.  स्वातंत्र्यपूर्व काळापासून या मतदारसंघांमध्ये कायम दुष्काळी तालुका म्हणून या तालुक्याकडे पाहिलं जातं या तालुक्यातील अनेक तरुण नोकरी व कामधंद्याच्या निमित्ताने मुंबई ,गुजरात ,व वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी जात आहेत. आता उरमोडी व जिहे-कठापूर योजनेमुळे या तालुक्यातील कायमस्वरूपी दुष्काळ संपनार आहे या भागांतील  संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली आल्यानंतर या भागातल्या तरुणांना मुंबई व इतर ठिकाणी कामानिमित्त जावं लागणार नाही तसेच शेती पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर या भागांमध्येअनेक छोटे मोठे उद्योग, व्यवसाय वाढीच्या दृष्टीने अनेक प्रयत्न होतील व या भागातील तरुणांच्या हाताला काम मिळेल या सर्व गोष्टीसाठी *खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे* यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे यानिमित्ताने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर लोकसभा निवडणुकी मध्ये मतदारसंघातील जनतेला जिहे-कठापूर, व सातारा रहिमतपूर म्हसवड मार्गे पंढरपूर कडे जाणाऱ्या रेल्वेचा प्रश्न सोडवण्यासाठी जो शब्द त्यांनी मतदारसंघातील  जनतेला दिला होता तो या निमित्ताने त्यांनी पूर्ण केलेला आहे. यामध्ये केंद्रीय जलसंपदा मंत्री व महाराष्ट्राचे माजी.मुख्यमंत्री  व विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील ,माजी. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी खूप मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य यानिमित्ताने केलेला आहे

Post a Comment

0 Comments