Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरोना हटावसाठी एकवटले ४० वैद्यकीय व्यवसायिक युद्धपातळीवर काम करण्याबरोबरच साडे सहा लाखांची भरीव देणगी.


वडूज : तहसिलदार डॉ. सौ. अर्चना पाटील यांच्याकडे धनादेश देताना वडूज मेडीकल असोसिएशनचे पदाधिकारी.

वडूज: कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वडूज परिसरातील सुमारे ४० वैद्यकीय व्यवसायिक एकवटले आहेत. कोरोनाच्या साथीत या व्यवसायिकांनी तन, मन, धन हरपून काम करण्याचा निर्धार कालावधीत केला आहे. त्याचबरोबर या व्यवासियांकानी वडूज मेडीकल असोसिएशनच्या माध्यमातून मुख्यमंत्री व पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी सव्वा तीन लाख रूपये असे एकूण साडे सहा लाख रूपयांची भरीव मदत दिली आहे.
तहसिलदार डॉ. सौ. अर्चना पाटील यांच्याकडे या मदतीचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. यावेळी अध्यक्ष डॉ. हेमंत पेठे, डॉ. बी.जे.काटकर, डॉ. व्ही.बी.देशमुख, डॉ. संतोष देशमुख, डॉ. शिवाजी कुंभार, डॉ. हणमंत मासाळ, डॉ. कुंडलीक मांडवे, डॉ. महेश माने, डॉ. वैभव भंडारे, डॉ. अजित इनामदार, डॉ. संजय शहा, डॉ. देविदास फडणीस, डॉ. एन.व्ही. करमारे, डॉ. विपूल गांधी, संजय जाधव, संतोष कुलकर्णी, आदी उपस्थित होते.
यावेळी तहसिलदारांसमवेत कोरोना आजारा संदर्भात चर्चा झाली. वैद्यकीय व्यवसायिकांनी स्वत:ची काळजी घेण्याबरोबरच येणाऱ्या प्रत्येक रूग्णास धिर देण्याचा प्रयत्न करण्याबाबत सर्वांचे एकमत झाले. यावेळी मुंबई,पुणे शहरातून येणाऱ्या रूग्णांच्या समस्या व इतर अडी अडचणी संदर्भात मुद्दे उपस्थित झाले.
या उपक्रमास डॉ. प्रशांत गोडसे, डॉ. चंद्रशेखर नांगरे, डॉ. वैभव बेंद्रे, डॉ. अशोक तासगावकर, डॉ. रविंद्र हिरवे, डॉ. सुरेश कोळेकर, डॉ. प्रविण चव्हाण, डॉ. सचिन पवार, डॉ. शशिकांत लंगडे, डॉ. अवधूत चव्हाण, डॉ. ए.बी. बोडके, डॉ. धनंजय खाडे, डॉ. गिरीष जोशी, डॉ. एम.सी. पाटील, डॉ. नारायण बनसोडे, डॉ. महेश जाधव, डॉ. सुहास घोरपडे, डॉ. विनोद चव्हाण, डॉ. किशोर भंडारे, डॉ. संदिप राजे, डॉ. अमृत चव्हाण आदींनीही सक्रीय सहभाग नोंदवणार असल्याचे जाहीर केले.

Post a Comment

0 Comments