Hot Posts

6/recent/ticker-posts

उंब्रज येथील महिला कोरोना बाधीत

उंब्रज;  दि. 01 (वार्ताहर )
कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यामध्ये उंब्रज येथील एका महिलेचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असल्याने उंब्रज परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमधून भितीने वातावरण निर्माण झाले आहे. 
                    दरम्यान, खबरदारी म्हणून रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये सहा कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी सांगितले आहे. अशी माहीती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. दरम्यान, कराड येथील उपजिल्हा रूग्णालयातील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून सातारा जिल्ह्याचा आकडा बावन्न वर गेला आहे. तसेच  कराड तालुक्यात आठ नवीन रुग्णांची भर पडली आहे. कराड मधील उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाच कोरोनाचा लागण झाल्यामुळे कराड आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 
     दरम्यान, कराड तालुक्यात महिनाभरात एक्केचाळीस इतकी रूग्ण संख्या झाली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये अर्ध्याहून अधिक रूग्ण हे कराड तालुक्यातील असल्याने तालुका प्रशासन अधिकच सतर्क झाले प्रशासनाकडून योग्य  ती  खबरदारी घेतली जात आहे .मात्र, तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
             उंब्रज,  ता. कराड येथील एक महिला कोरोना बाधीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून उंब्रज तसेच परिसरामध्ये खळबळ उडाली असून येथील आरोग्य विभाग तसेच पोलीस प्रशासन अहोरात्र डोळ्यात तेल घालून कोरोना विरूद्ध निकराची झुंज देताना आपल्याला आढळत आहे. दरम्यान, रात्री दहा वाजता आलेल्या रिपोर्ट नुसार कराड तालुक्यातील आणखी काही जण बाधित असल्याची माहिती समोर आली असून हे सर्व जण एकाच ठिकाणी काम करीत होते. 
                दरम्यान, उंब्रज येथील कोरोना बाधीत असणाऱ्या  सत्तावीस वर्षीय महिलेला आरोग्य विभागाने गुरूवारी रात्री राहत्या घरातून कराड येथे रूग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली असून गुरूवारी रात्री रात्रभर पोलीस प्रशासन तसेच आरोग्य विभाग उंब्रज येथील चोरे रोड परिसरात ठाण मांडून होते. दरम्यान, उंब्रज तसेच परिसर पूर्णपणे सील करण्यात आला असून पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 
                 या सर्व परिस्थितीवर प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदिप वाकडे, पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव, गटविकास अधिकारी डाॅ. आबासाहेब पवार, उंब्रजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ . संगीता देशमुख, उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. संजय कुंभार हे जातीने लक्ष ठेवून आहेत. 

Post a Comment

0 Comments