![]() |
142 जण विलगिकरणात, 60 नमुन्यांच्या अहवालाकडे तालुक्याचे लक्ष
राम पाटील/ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पाटण : तालुक्यातील 28 कोरोना बाधीत रूग्नांवर सध्या कृष्णा हाॅस्पीटल, कराड येथे उपचार सुरू आहेत. तालुक्यात तीन ठिकाणी एकूण 142 व्यक्तींना इन्स्टीट्युशनल क्वारंटाइन करण्यात आले आहे. यापैकी बाधीत रूग्नांच्या संपर्कातील कुटुंबीय, नातेवाईक आदीचे 60 हून अधिक स्वॅप नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून यांचा तपासणी अहवाल मंगळवारी संध्याकाळी किंवा बुधवारी सकाळी येण्याच्या शक्यता असल्याची माहिती प्रांताधिकारी श्रीरंग तांबे व तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. आर. बी. पाटील यांनी दिली. दरम्यान, रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार सळवे (वरपेवाडी) येथील पती-पत्नी दोघेही तसेच नवारस्ता येथील 12 वर्षीय मुलगी असे 3 जण पॉझिटिव्ह आले असून पाटण तालुक्यात एकूण - ३३ पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत.
आजपर्यंत तालुक्यात एकूण 30 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली त्यापैकी डेरवण येथील दहा महिन्याचे बालक कोरोनामुक्त झाले तर बनपुरी येथील एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर आत्तापर्यंत 28 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून त्यात बनपुरी येथील 7, शिरळ 5, शितपवाडी व गोकुळ तर्फ पाटण प्रत्येकी 3, गावडेवाडी 2 तर म्हावशी, चाळकेवाडी, धामणी, भालेकरवाडी, गलमेवाडी, सदूवरपेवाडी, भरेवाडी, अडूळ (काळेवाडी) येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सोमवारी रात्री उशीरा प्राप्त झालेल्या अहवालामध्ये तालुक्यातील दोघांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आली होती परंतु खळे येथील बाधीत हा सध्या कराड तालुक्यात वास्तव्यास असल्याने त्याची नोंद कराड तालुक्यात तर अडूळ (काळेवाडी) येथील रूग्नाची नोंद पाटण तालुक्यात धरण्यात आली आहे. यापैकी सर्व 28 कोरोना बाधीत रूग्नांवर सध्या कृष्णा हाॅस्पीटल कराड येथे उपचार सुरू आहेत लवकरच त्यांना पाटण येथील समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहातील कोरोना केअर सेंटरमध्ये आणण्यात येणार आहे. या बाधीत रूग्नांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीय व नातेवाईक यांना इन्स्टीट्युशल क्वारंटाइन करण्यात आले आहे. मंगळवारी यात सहा व्यक्तींची वाढ झाली आहे.सध्या पाटण कोरोना केअर सेंटरमध्ये 50, तळमावले कोरोना केअर सेंटरमध्ये 73 व बी. एड. काॅलेज पाटण येथे 19 व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले आहे. याच क्वारंटाइन व्यक्तींपैकी 54 व्यक्तींचे स्वॅप नमुने सोमवारी तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यांचे अहवाल मंगळवारी रात्री किंवा बुधवारी सकाळी येण्याच्या शक्यता आहेत. तथापी मंगळवारी बाधीत रूग्नांच्या संपर्कातील खाजगी रूग्णालयातील कर्मचारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, खाजगी दवाखाने व परस्पर जाणाऱ्या संशयीत व्यक्तींचेही स्वॅप नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत यात पाटण शहरातील व्यक्तींचाही समावेश आहे. आजपर्यंत तालुक्यात व पाटण शहराच्या चारही बाजूंच्या म्हावशी, गावडेवाडी, गोकुळ तर्फ पाटण व आडूळ (काळेवाडी) येथे कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत परंतु अद्याप पाटण शहरात कोरोनाचा एकही रूग्ण सापडलेला नाही .त्यामुळे आता यामध्ये संबंधित पाटण शहरातील व्यक्तींचे अहवाल काय येतात याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.
दरम्यान तालुक्यात कोरोनाचा एकही रूग्ण नसताना व्यापारी बाजारपेठा शंभर टक्के बंद व लाॅकडाउनचे काटेकोरपणे पालन होत होते. परंतु सध्या तालुक्यात बहुतांशी गावात कोरोनाचे रूग्ण मोठ्या संख्येने वाढतच चालले असताना दोन महिन्यांहून अधिक काळ बंद असलेली दुकाने, बाजारपेठा उघडण्यात आल्या आहेत. यात अत्यावश्यक व अपवाद वगळता इतर सर्वच आवश्यक सेवा, दुकाने उघडण्यात आली आहेत . यात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची तर बँकांमध्ये खातेदारांची गर्दी होत आहे. यात बहुतेकजण तोंडाला मास्क लावत नाहीत, सोशल डिस्टसिंगचे पालन होत नाही, रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी थुकंणे आदीसह सॅनीटायझरचा वापर होत नाही. राजरोसपणे अशाप्रकारे नियम, निर्बंधांची पायमल्ली होत असल्याने येथे जर अशीच अवस्था राहीली तर भविष्यात कोरोनाची साखळी तुडणे तर सोडाच येथे रूग्नांची मालिकाच लागेल आणि परिस्थिती शासनासह सामान्यांच्याही हाताबाहेर जाईल असेच चित्र बहुतांशी गावे व स्थानिक बाजारपेठेत पहायला मिळत आहे.

0 Comments