कवठे
वेळे
तालुका वाई येथील एका 59 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट
झाले. त्यामुळे संपूर्ण वेळे गाव पुन्हा एकदा सील करण्यात आले. वाईचे
प्रांताधिकारी यांनी याबाबत निर्देश दिले आहेत.
कोरोनाबाधित
रुग्ण हा मुंबईवरून काही दिवसांपूर्वी गावाला आला होता. त्याला त्रास
जाणवू लागल्याने सातारा येथील शासकीय रुग्णालयात त्याच्या घशाच्या
स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी तपासणी
अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये त्याला कोरोना झाला असल्याचे निष्पन्न
झाले.
खबरदारीचा उपाय
म्हणून या रुग्णाच्या सहवासातील दोघांना सातारा येथील शासकीय रुग्णालयात
विलागिकरण कक्षात तर चौघांना वाई येथील किसनवीर महाविद्यालयातील शासकीय
विलगीकरन कक्षात दाखल करण्यात आले. यामध्ये चार पुरुष व दोन महिलांचा
समावेश आहे. अजूनही कोण या रुग्णाच्या नजीकच्या संपर्कात आले आहे का याची
चौकशी आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.
वेळे
गावात आरोग्य विभागाच्या दहा टीममार्फत संपूर्ण गावाचे सर्वेक्षण पुढील 14
दिवस सातत्याने करण्यात येणार असल्याचे कवठे प्राथमिक आरोग्य केंद्राचे
आरोग्य अधिकारी डॉ. ठोंबरे यांनी सांगितले. तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब,
कॅन्सर, टिबी, एच.आय. व्ही., दमा, अस्थमा यांसारखे आजार असणाऱ्या व्यक्ती,
पुढील 15 दिवसाच्या गरोदर माता, 60 वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती यांचा
कोमोर्बिड सर्वे देखील पुढील पाच दिवसांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे
सांगितले.
या कोमोर्बिड सर्वेक्षणामध्ये एस.पी.ओ.
टू., तापमान, ब्लडप्रेशर, शुगर यांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी
जिल्हा परिषदेच्या वतीने आशाताईंना पल्स ऑक्सीमीटर पुरविण्यात आले आहेत.
तसेच सर्दी, ताप, खोकला यांसारख्या आजारांवर देखील बारकाईने लक्ष ठेवले
जाणार आहे. कोरोना रोगाचा मृत्युदर आटोक्यात आणण्यासाठी व कोरोना रोगाचे
निदान लवकर समजण्यासाठी कोमोर्बिड सर्वे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.
त्यामुळे रुग्णाला लवकर उपचार सुरू करणे सोपे होते.
पुणे
व मुंबई या ठिकाणाहून आलेल्या सर्वांची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासून या
सर्वांनाच विलागीकरण कक्षात ठेवणार आहेत. तसेच कोमोर्बिड सर्वेक्षणात
ज्यांचा एस.पी.ओ. टू. हा 95 च्या खाली असेल अशा सर्वांना देखील विलग केले
जाणार आहे. कोरोनाची लक्षणे ही सर्वांना एकसारखी दिसत नाहीत. ज्यांची
ह्युमिनिटी पावर चांगली असेल त्यांना हा रोग कधी झाला आणि बरा कधी झाला
हेदेखील समजत नाही. त्यामुळे या रोगाचा प्रसार पूर्णपणे आटोक्यात
आणण्यासाठी आरोग्य विभाग झटत आहे.

0 Comments