
शेंद्रे : पुणे -बंगळुर महामार्गावर वळसे ता . सातारा गावाच्या हद्दीत शुकवारी सकाळी पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणार्या स्विप्ट कारने पुढे चाललेल्या तीन दुचाकींना जोरदार धडक दिली या अपघातात एकाचा मुत्यु तर दोघे गंभीर जखमी झाले. अविनाश बाळकृष्ण पाटील (रा. कार्वे नाका कराड) असे कारचालकाचे नाव असून पोलिसांनी सायंकाळी उशिरा त्याला ताब्यात घेतले.
याबाबद सविस्तर व्रत शुक्रवारी सकाळी साडे नऊ च्या सुमारास सातार्याच्या दिशेने जाणार्या लेनवर हा भीषण अपघात घडला भरधाव वेगाने जाणार्या स्विप्ट कार नं . एमएच 11 डब्यु 302 पुढे चाललेल्या तीन दुचाकींना धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की त्यातील एक दुचाकीस्वार महामार्गावरील उड्डानपुलाहुन सुमारे 25 फुटखाली सेवारस्त्यावर कोसळला अपघातात तीन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले कारचालकाने घटनास्थळावरूनच पलायन केले जखमींना तातडीने शासकीय रुग्णालय सातारा येथे हलवण्यात आले पण महामार्गावरुन सेवा रस्त्यावर कोसळलेल राजेंद्र हणमंत घाडगे ( वय 45 वर्षे ) रा .समर्थगाव ता. सातारा यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला हे जिल्हा परिषद मध्ये आरोग्य सेवक म्हणुन कार्यरत होते तसेच अमर शिवाजी पावस्कर ( वय 32 ) रा . मल्हार पेठ ता. पाटण व कुमार माणिक पोतदार ( वय 36 ) रा . सासपडे ता. सातारा हे अपघातात गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत
अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक काही वेळ विस्कळीत झाली होती पण मजनता क्रेनफ चे अब्दुल सुतार, अजीम सुतार , सुहेल सुतार यांनी बोरगाव पोलीस स्टेशनच्या सहकार्याने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजुला काडत वाहतुक सुरळीत केली.
0 Comments