![]() |
| पाणीपूजन प्रसंगी मा.आ.डॉ. दिलीपराव येळगावकर, सचिन गुदगे,व ग्रामस्थ |
मायणी:- दत्ता कोळी
तारळी योजनेचे पाणी मायणी येथील पडळकर तलावात व माळीनगर तलाव
व खडकाचा मळा तलाव येथे पोहोचले असून या प्रश्नी सातत्याने लढा देत
पाठपुरवठा करून पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिवारातील शेतकऱ्यांनी डॉ
दिलीपराव येळगावकर यांचा सन्मान केला. या पाण्याचे पूजन मा.आ.डॉ. दिलीपराव
येळगावकर,डॉ. सौ.उर्मिला येळगावकर,युवानेते सचिन गुदगे, तंटामुक्ती अध्यक्ष
आप्पासाहेब देशमुख, उपसरपंच आनंदराव शेवाळे, महादेव ढवळे,नितीन पडळकर
,अभिजित काबुगडे,महिला व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात
आले.स्व.भाऊसाहेब गुदगे यांचे स्वप्न डॉ. येळगावकरांच्या प्रयत्नातून साकार
झाल्याबद्दल युवानेते व मायणीचे सरपंच सचिनभाऊ गुदगे यांनी आनंद व्यक्त
केला.
पत्रकारांशी बोलताना मा.आ.डॉ. येळगावकर म्हणाले,आ.चंद्रकांतदादा पाटील, ना
गिरीश महाजन, सुभाष देशमुख यांच्याशी पाणी योजनांसंबंधी चर्चा झाली होती.
धोंडेवाडी उड्डाणपूलाचे काम बंद होते. पुन्हा पाठपुरावा केला.त्यामध्ये
रणजित देशमुखांचाही वाटा आहे. तारळीसाठी प्रयत्न केला. अनफळे व माळीनगर
याठिकाणी पाणी नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गुंडेवाडी ,यलमरवस्ती, चितळी
येथे पाणी नेण्यासाठी प्रयत्न करणार.भाऊसाहेबांना हे पाणी आणायचे होते.
उरमोडीतून तारळीत पाणी येत आहे.
टेंभू चे पाणी लवकरच मायणीच्या धरणात येईल. काम सुरु आहे.
मायणीतील पंढरपूर मल्हारपेठ महामार्गाचेही काम ८० टक्के काम
पूर्ण झाले आहे. यशवंतबाबा मंदिराजवळचे रस्ता रुंदीकरणातील अडचणी दूर
करु.पूर्ण इमारत ढासळू नये म्हणून काहीना सवलत दिली. अभेद्य संघटनेच्या
जोरावर विकासकामे गतीने पूर्ण होत आहेत असे डॉ. येळगावकर म्हणाले.
मोहन दगडे यांनी आभार मानले. राजू कचरे यांनी
सूत्रसंचालन केले.

0 Comments