Hot Posts

6/recent/ticker-posts

पोलिसांच्या कारवाईत पन्नास हजारांचा दंड वसूल

 भुईंज पोलिसांनी महामार्गावरील सर्व ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर धडक कारवाई केली.


वेळे वार्ताहर दिनांक 10

भुईंज पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत विना मास्क फिरणाऱ्या बेजबाबदार  शेकडो नागरिकांच्यावर केलेल्या करवाईतून तब्बल पन्नाहजार पाचशे  रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.  भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे सातारा- सातारा पुणे या महामार्गावरील अानेवाडी टोल नाका,पाचवड,भुईंज,जोशीविहिर,सुरुर,वेळे आणि जांब या परिसरात दुचाकी आणि चार चाकीतून विना मास्क फिरणाऱ्या 101 नागरिकांच्या विरुद्ध भुईंज पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी शाम बुवा, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे व त्यांच्या पोलीस सहकाऱ्यांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या ठिकाणी धडाकेबाज कारवाई करून  प्रत्येकी 500 रुपयाप्रमाणे दंड वसूल केला. या झालेल्या कारवाई मधून तब्बल 50500 रुपयांचा महसूल गोळा करण्यास शाम बुवा याना यश आले आहे.
    गेल्या 20 दिवसापासून वाई शहरासह तालुक्यातील गावागावामध्ये कोरोनो रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे ग्रामीण भागामधील गावांमध्ये आज अखेर हजारो पोसिटीव्ह रुग्ण सापडले आहेत तर एकट्या वाई शहरामध्ये दररोज शेकडो पोसिटीव्ह रुग्णाची संख्या होत आहे. आज अखेर या कोरोनो रोगामुळे शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. . वाई च्या पूर्व भागातील भुईंज पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या गावांमध्ये एक ऑगस्ट पासून कोरोनो रोगाने गावोगावी मुक्काम ठोकत दररोज नवी नवी गावे शोधत शोधत या कोरोनोच्या वाढत्या संख्येमुळे भुईंज पोलीस ठाण्याचे स.पो.नि शाम बुवा हे चिंताग्रस्त झाले. अनेक गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत असल्यामुळे याचे कसलेच गांभीर्य नागरिकांमधून दिसून येत नव्हते. गावागावातील नागरिक मास्क न लावता किंवा सामजिक अंतर न ठेवता फिरताना दिसत होते. त्यामुळे या बेजबाबदार वागणाऱ्या नागरिकांमुळे कोरोना विषाणू गावोगावच्या उंबरट्यापर्यंत जाऊन पोहचला. त्यामुळे कोरोनो ची रुग्ण संख्या दिवसेंदीवस  वाढत गेल्याने अनेकांना त्यात आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा भीषण घटना घडत असल्यामेळे भुईंज पोलीस ठाण्याचे स.पो.नि शाम बुवा कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी त्यांनी आपले सहकारी रत्नदीप भंडारे व पोलीस कर्मचार्यांशी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी व मास्क न लावता दुचाकी व चारचाकी वाहनातून फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करण्यासाठी प्राणाची बाजी लावून रस्त्यावर उतरले तरच कोरोनाची ही वाढती साखळी तोडण्यास नक्कीच यश येईल असे सर्वांना समजून सांगितले. संपूर्ण पोलीस ठाणे भागातील अानेवडी टोल नाका,पाचवड,भुईंज,जोशीविहीर,सुरूर,वेळे अशा मुख्य रस्त्यांवर उतरून चौकाचौकात नागरिकांच्यावर कारवाई करण्याचे ठरल्यानंतर भुईंज पोलीस ठाण्याचे स.पो.नि शाम बुवा, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे हवलदार एम. जी .घाडगे, एस.एम.तोरडमल,दि.एम.धायगुडे,चंद्रकांत मुगसे,तुकाराम पवार ,अानंदा भोसले, प्रियांका कदम ,ए.वी.आवळे,एस.आर.पवार, पी.बी.दुदुस्कर, धनाजी कदम, एस.एस. नलवडे, बी.बी.कोळपे, डी. एम.गायकवाड ,आर.पी.कांबळे , तेजल कदम या सर्वांनी  सकाळी 8 वाजल्यापासून भर पावसामध्ये रस्त्यावर उतरून तब्बल 101 विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर अचानक धडाकेबाज कारवाई करून प्रत्येकी 500 रुपयांचा दंड वसूल केला.  50500 रुपयांचा महसूल गोळा करण्यास आणि बेजबाबदार नागरिकांना मास्क वापरण्याचा दंडात्मक धडा शिकवण्यास भुईंज  पोलिसांना मोठे यश आले आहे. भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये वाढती कोरोनो रुगणाची संख्या थोपवन्यासाठी भुईंज पोलिसांनी कंबर कसली आहे. यापुढे हद्दीतील प्रत्येक गावात आपापल्या बीट प्रमाणे पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांच्यावर अशा दंडात्मक करावाया करून कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येची साखळी तोडणार असल्याचे स पो नि शाम बुवा यांनी  सांगितले. ही कारवाई करत असताना 23 हॉटेल मालकांवर व किराणा दुकानदारांवर  ग्राहक व स्वतःमध्ये सामाजिक अंतर न ठेवल्यामुळे त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, तर दोन जणांवर विरुद्ध कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.

Post a Comment

0 Comments