सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
खटाव: सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला. मराठा आरक्षण प्रकरण आता घटनापीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्यात आली आहे. पाच न्यायाधीशांचा समावेश असलेले घटनापीठ मराठा आरक्षणावर सुनावणी करणार आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचे भवितव्य आता घटनापीठाच्या निर्णयावरून ठरणार आहे. मात्र सातारा जिल्ह्यतून प्रथमच खटाव तालुक्यातून व खटाव गावातून
मराठा आरक्षणाची मशाल पेटली आहे आणि या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वाटेल ते करण्याची तयारी जयदीप शिंदे यांनी दर्शवली आहे.
महाराष्ट्रात बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी दीर्घकाळापासून करण्यात येत आहे. त्यानंतर मराठा समाजाने काढलेले मुक मोर्चे आणि नंतर झालेल्या तीव्र आंदोलनानंतर तत्कालीन सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या विषयावरून पुन्हा न्यायालयीन लढाई सुरू झाली होती. उच्च न्यायालयातील सुनावणीत मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर ही लढाई सर्वोच्च न्यायालयात पोहोचली होती. तेव्हापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये याबाबतची सुनावणी सुरू आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिल्याने त्याचा मराठा समाजातील उमेदवारांना २०२०-२१ मध्ये नोकरी आणि शिक्षणातील प्रवेशांमध्ये आता आरक्षण मिळणार की नाही ही संभ्रम अवस्था युवकांमध्ये निर्माण झाली आहे.
मात्र खटाव मध्ये मराठा संघटक जयदीप शिंदे यांनी खटाव मधील मराठा समाजातील युवक युवती तरुण मित्र या सर्वांना एकत्र करून मराठा आरक्षण मिळण्याकरिता एक ऐतिहासिक वज्रमूठ बांधली आहे. याकरिता जयदीप शिंदे यांनी मराठा आरक्षण मिळण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी दाखवली आहे. आणि याच भूमिकेत जयदीप शिंदे यांना सर्व सकल मराठा समाजाने एकत्र येऊन साथ दिली आहे.
प्रशासनाने अंत पाहू नये.
मराठा आरक्षणाला सर्वोच न्यालायने स्थगिती दिल्यानंतर मराठा विद्यार्थी व मराठा तरुण शिक्षण व सरकारी नोकऱ्या संधर्भात हवाल दिल झाला आहे
केंद्र सरकार व राज्यसरकार च्या सत्तासंघर्षात मराठा समाजाचे हाल होत आहेत.
जो पर्यंत मराठा आरक्षणाचा विषय निकालात निघत नाही तो पर्यंत राज्य सरकारने कोणती ही सरकारी नोकरी भरती घेऊ नये व मराठा विद्यार्थ्यांना उच न्यालायने दिलेल्या मराठा आरक्षणाच्या निकालाच्या धर्तीवर महाविद्यालयात प्रवेश मिळावा या आमच्या प्रमुख मागण्या आहेत
जर सरकारने व प्रशासनाने योग्य तो मार्ग यावर काढला नाही तर मराठा समाज आता शांत बसनार नाही,प्रशासनाने मराठा समाजाचा सहन शिलतेचा अंत पाहू नये.
जयदीप शिंदे
मराठा संघटक, खटाव

0 Comments