देवापूर
: गेल्या आठ दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दिघंची - म्हसवड मार्गावर असलेल्या देवापूर ओढ्यावरील पुलाला जोडणारा रस्ता खचल्याची घटना घडली आहे. म्हसवड ला जोडणारा रस्ता खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोक्याची बनली आहे. पुलावरून पाणी मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने पश्चिमेकडील कठडा तुटला आहे. तसेच पुलाच्या मध्यभागी खड्डे पडले आहेत. तरी संबंधित बांधकाम विभागाने सदरच्या पुलाची तात्काळ डागडुजी करावी अशी मागणी सध्या जोर धरत आहेत.
मुसळधार पाऊस झाल्याने दोन मोठे खड्डे पडुन डबके साचले आहे.त्यामुळे दुचाकी चार चाकी चालकाला खड्डा चुकवतांना मोठी कसरत करावी लागत असुन अनेक वेळा डबक्याचे पाणी व चिखल उडुन प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे अनेकवेळा यावरून प्रवासी व चालकात तु तु मै मै होऊन भांडणे होत असतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी संबंधित विभागाला याबाबत कल्पना दिली होती.त्या अनुषंगाने फक्त मुरूम टाकून मलम पट्टी करण्यात आली. मात्र कायम स्वरुपी उपाय योजना करण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे. स्थानिक अथवा बाहेरून येना जाणाऱ्या प्रवाशांच्या जीवितास या खड्ड्यांमुळे धोका निर्माण झाला आहे. त्यातच जांभुळणी व
गंगोती तलाव ओव्हर फ्लो वाटर देवा पूर पुलावरील पाण्याची अनियमित पातळी वाढत असल्याने धोका संभवत आहे.
सदर ठिकाणी अशी घटना घडल्या स त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ लक्ष देऊन पुल व त्यावरील खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे.
0 Comments