Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना व शिवप्रेरणा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यामाने बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती उत्साहात

तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची 95 वी जयंती व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती सातारा शहर शिवसेना व शिवप्रेरणा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली
महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री माननीय नामदार श्री शंभूराज देसाई माननीय, आमदार श्री महेश शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री यशवंत घाडगे, जिल्हाप्रमुख श्री चंद्रकांत जाधव, सातारा तालुका संपर्क प्रमुख श्री एकनाथ ओंबळे, शिवसेना तालुकाप्रमुख श्री दत्ताजी नलावडे इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले त्यानंतर वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गोरगरीब व गरजू लोकांना चादर,ब्लॅंकेट व स्वेटर वाटप करण्यात आले तसेच आर्य अँगल हॉस्पिटल येथील रुग्णांना अन्नदान करण्यात आले शाहू बोर्डिंग मधील मुलांना मिष्ठान्न वाटप करण्यात आले त्यानंतर शिवसेना शहर प्रमुख श्री बाळासाहेब शिंदे व उपशहरप्रमुख श्री शिवाजीराव इंगवले यांच्या हस्ते यशोधन ट्रस्ट मधील निराधार व्यक्तींना चादर ब्लॅंकेट तसेच सातारा शहरातील रस्त्याच्या कडेला आणि एसटी बस स्थानकातील निराधार व गरजू व्यक्तींना चादर, ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले
यावेळी बोलताना गृहराज्यमंत्री नामदार श्री शंभूराजे देसाई यांनी शहर प्रमुख श्री बाळासाहेब शिंदे यांच्या 36 वर्षातील सामाजिक व राजकीय कार्याचे कौतुक केले शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती घेऊन प्रतिष्ठानला शुभेच्छा दिल्या माननीय आमदार श्री महेश शिंदे, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे चंद्रकांत जाधव, श्री एकनाथ ओंबळे यांनीही ही कार्यक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या
यावेळी कार्यक्रमास माझी आमदार माननीय श्री सदाशिव भाऊ सपकाळ, माजी जिल्हाप्रमुख श्री हनुमंतराव चवरे, शाखाप्रमुख विनायक शिंदे, योगेश शेलार, दत्ता धुरपे, विभाग प्रमुख सुनील भोसले, सुमित नाईक, संतोष गडकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष हैबतबापू नलावडे, सदस्य मेजर रवींद्र शेळके, एडवोकेट विनोद निकम, प्रकाश भोसले, दीपक पाटील, निलेश शिंदे मनोज निंबाळकर, कुमार पोतदार, शांताराम भणगे, राजू नाईक, बंडोपंत शिंदे, नितीन नारकर, अमित शिंदे, महेश देशपांडे, नागेश गवळी, महेश पाटील, निलेश मोरे, सचिन शिंदे, राहुल साळुंखे, किशोर सोनटक्के, अनिल शिंदे, शिवाजी पवार, रजत नाईक सागर पवार, आशुतोष पारंगे, सुनील यादव, मंगेश जाधव, किसनराव नलवडे, पांडुरंग जाधव, दिनेश देशपांडे इत्यादी शिवसैनिक शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी शिवप्रेरणा प्रतिष्ठानचे सदस्य व सातारा शहरातील नागरिक उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशहर प्रमुख श्री शिवाजीराव इंगवले यांनी केले व दीपक पाटील यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले

Post a Comment

0 Comments