Hot Posts

6/recent/ticker-posts

महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण सोडत जाहीर

महाबळेश्वर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीचे निकाल नुकतेच जाहीर झाले.आता गावकारभाराची नेमकी सूत्रे कोणाच्या हाती जाणार  हा ग्रामपंचायतील  नागरिकांमध्ये कुतूहलाचा विषय बनला होता.   
       महाबळेश्वर तालुक्यातील बहुचर्चित ४२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत  आज अखेर २९ रोजी जाहीर झाली असून अपेक्षेप्रमाणे कोणाचा अपेक्षाभंग तर कोणाला अनपेक्षित यश आल्याचे संमिश्र  चित्र पहायला मिळत होते. महाबळेश्वर येथील शासकीय मधोउत्पादक संस्थेच्या  सभागृहामध्ये   महाबळेश्वरच्या तहसीलदार  श्रीमती सुषमा चौधरी पाटील यांच्या मार्गदर्शनात  ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली.सदर कार्यक्रमादरम्यान पंचायत समितीच्या सभापती सौ. अंजनाताई कदम  ह्या देखील उपस्थित होत्या.
       जवळपास ११ दिवसांपासून  विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांची प्रतीक्षा अखेर संपली. नागरिकांनी मोठ्या संख्येने  सभागृहात आरक्षण सोडतीसाठी गर्दी केली होती. एकूण तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत एका लहान मुलाच्या हस्ते काढण्यात आले
 ४२ ग्रामपंचायतीसाठी गावनिहाय सोडत खालीलप्रमाणे
अनुसूचित जाती महिला :- 
दांडेघर, गोगवे, कुमठे, वलवण. 
अनुसूचित जाती :- 
रुळे, खिंगर, दाभेमोहन .
अनुसूचित जमाती महिला :-
कुंभरीशो, येर्ने बु, गोरोशी.
अनुसूचित जमाती :-
बिरवाडी, मेतगुताड.
ना.मा .प्र.महिला :-
हरचंदी, मोरणी, सोनाट, देवळी, गावढोशी, अवकाळी, एरंडल, मेटतळे, आमशी, भौसे, अचाट.
ना.मा.प्र :-
शिरवली, आचली, वाळणे, दाभेदाभेकर, गोडवली, कासवंड, सौंदरी, नाकींदा, भेकवली, कळमगाव.

सर्वसाधारण महिला :-
तायघाट, दानवली, पाली तर्फे आटेगाव, कुरोशी, वेळापूर, उंबरी, झांजवड, चतुरबेट, वेंगळे, राजपुरी, हातलोट, चिखली, भीमनगर, पांगरी, खरोशी, खांबील चोरगे, पर्वत त वाघवळे, लामज, बिरमणी, पारपार, साळोशी,  लाखवड .

सर्वसाधारण :-
देवसरे, मांघर, पारुट, आकल्पे, अहिर, माचुतर, जावली, तळदेव, भिलार, वानवली त सोळशी, रेणोशी, गुरेघर, आरव, रामेघर, कोट्रीशी, क्षेत्र महाबळेश्वर, आंब्रळ, मोळेश्वर, घावरी, निवळी, दुधगाव, वारसोळी देव.

Post a Comment

0 Comments