मुंबईस्थित असणारा जत्रे निमित्त रुळे येथे आपल्या गावाला आलेला सुशांत तसेच गावात राहणारा त्याचा चुलत भाऊ अनिकेत या दोघांचा रविवारी शिवसागर जलाशयात पोहत असताना बुडून मृत्यू झाला.घरी लवकर न परत आल्याने शोधाशोध केली असता त्यांचे कपडे तलावाजवळ आढळून आले. त्यामुळे या ठिकाणी ते बुडाले असण्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्या अनुषंगाने या जलाशयात शोधकार्य सुरू केले.
सोमवारी सकाळ पासूनच स्थानिक ग्रामस्थ, महाबळेश्वर ट्रेकर्स यांच्या कडून शोधकार्य सुरू होते.दुपारच्या वेळी सुशांत याचा मृतदेह शोधण्यात यश आले.परंतु दुसरा काही सापडत नव्हता त्याचा शोध घेणे उशिरा पर्यंत सुरू होते.मात्र आज मंगळवारी अथक प्रयत्न करून गोगवे येथील कातकरी समाजातील लोकांकडून १२:३० च्या सुमारास दुसरा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे
0 Comments